Iran Earthquake: अमेरिका-इराण वादाचे ढग अधिक गडद होत असताना आता इराणमधील बुशहर शहरात अणुऊर्जा केंद्राजवळ शक्तीशाली भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, बुधवारी सकाळी 7.50 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी होती. पंरतु, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, या भूकंपाचे केंद्र इराणच्या बोराझजान शहराच्या आग्नेय दिशेला 10 किलोमीटर होते. मागील महिन्यातही या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज जाणवलेले धक्के हे भूकंपाचेचं असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा - इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला मोठा विमान अपघात; 180 पॅसेंजर मृत्यूमुखी)
A 4.9 magnitude earthquake struck near #Iran's Bushehr: United States Geological Survey
— ANI (@ANI) January 8, 2020
इराणने बुधावारी अमेरिकेच्या लष्करी तळांवर 12 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात अमेरिकेच्या 30 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा इराणने केला आहे. परंतु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर ट्विट करून सर्व काही ठिक असल्याचं म्हटलं होतं. आज सकाळी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या हल्ल्याचे हादरे हवाई हल्ल्याचे नसून नैसर्गिकरित्या उद्भवलेल्या भूकंपाचे असल्याचे जिओलॉजिकल सर्वेने स्पष्ट केले आहे.