Hinduja Family Members Sentenced to Jail: ब्रिटनमधील श्रीमंत हिंदुजा कुटुंबाविरोधात स्विस कोर्टाचा मोठा निर्णय आला आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना घरातील नोकरांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी न्यायालयाने साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रिपोर्टनुसार, कोर्टाने हे आरोप अतिशय गंभीर मानले आहेत. प्रकाश हिंदुजा सोबत, त्यांची पत्नी कमल, मुलगा अजय आणि सून नम्रता यांच्यावर त्यांच्या नोकरांची तस्करी केल्याचा आरोप होता, जे बहुतेक निरक्षर भारतीय होते. हे कामगार जिनिव्हा या स्विस शहरात हिंदुजा यांच्या लेकसाइड व्हिलामध्ये काम करत होते. हिंदुजा कुटुंबातील पाचव्या आरोपी आणि व्यवस्थापकाला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हिंदुजा कुटुंबावर नोकरांपेक्षा कुत्र्यावर जास्त खर्च केल्याचा आरोप होता. लेक जिनिव्हा येथील आपल्या व्हिलामध्ये त्याने एका भारतीय महिलेला कामावर ठेवले आणि तिला अत्यंत कमी पगार दिल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर तिचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आणि तिला 18 तास काम करायला लावले. महिलेला फक्त 7 स्विस फ्रँक (सुमारे 6.19 पौंड) दिले गेले. अहवालानुसार, न्यायालयाने हिंदुजा यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे शोषण आणि 'अनधिकृत' रोजगार पुरवल्याबद्दल दोषी ठरवले. स्वित्झर्लंडमध्ये नोकरांचे शोषण, मानवी तस्करी आणि स्विस कामगार कायद्यांचे उल्लंघन हे मोठे गुन्हे मानले जातात. (हेही वाचा: Hajj 2024: मक्का येथे हज यात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)