Artificial Colors in Chicken Kebabs and Fish Dishes: कर्नाटक सरकारने सोमवारी राज्यात चिकन कबाब आणि फिश डिशमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या पदार्थांच्या यादृच्छिक नमुन्यांवरील गुणवत्तेच्या तपासणीत, कृत्रिम रंगांमुळे त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलले गेले. राज्यातील प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या 39 नमुन्यांपैकी आठ नमुने असुरक्षित आढळले. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, जनतेचे आरोग्य लक्षात घेऊन कृत्रिम रंग बंदीचा आदेश देण्यात आला आहे. त्यांनी अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्तांना खाद्यपदार्थांमधील कृत्रिम रंगांच्या दुष्परिणामांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्याने याआधी 'गोबी मंचुरियन' आणि 'कॉटन कँडी'मध्ये कृत्रिम रंगांच्या वापरावर बंदी घातली होती. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 च्या नियम 59 अंतर्गत या बंदीचे उल्लंघन केल्यास सात वर्षापासून जन्मठेपेपर्यंत आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडासह कठोर शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा: Brawl Due to Shortage of 'Chicken Leg Piece': लग्नातील बिर्याणीत चिकन लेग पीस नसल्याने मोठी मारामारी; वराला आणि पाहुण्यांना बेदम मारहाण)
पहा पोस्ट-
Karnataka restaurants using artificial colors in food face fines up to ₹10 lakhs or 7 years in prison. Following a ban on artificial colors in Gobi Manchurian and Sugar Candy, Health Minister Dinesh Gundu Rao has extended the ban to Chicken Kebabs and Fish Dishes. Random checks… pic.twitter.com/RXyQ8LoElH
— IANS (@ians_india) June 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)