Brawl Due to Shortage of 'Chicken Leg Piece': उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका लग्न समारंभात चक्क चिकन लेग पीसवरून मोठा गोंधळ उडाला व त्याची परिणती मोठ्या भांडणात झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे प्रकरण बरेलीतील नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील सरताज बारातघरचे असल्याची माहिती आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, लग्नाचे वऱ्हाड सरताज बारातच्या घरी आली होती. एकीकडे लग्नाची औपचारिकता पूर्ण होत होती, तर दुसरीकडे लग्नातील पाहुण्यांना जेवण दिले जात होते. यावेळी लग्नातील काही पाहुण्यांना बिर्याणीमध्ये चिकन लेग पीस मिळाला नाही. यावरून लग्नातील पाहुण्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वधू पक्षाच्या पाहुण्यांना आधी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी रागाच्या भरात उलट उत्तर दिले. त्यामुळे मुलीकडचे लोक संतप्त झाले आणि काही वेळातच दोन्ही पक्षांमध्ये लाथा-बुक्क्या सुरू झाल्या. परिस्थिती अशी झाली की, मुलाकडच्या लोकांनी लग्न करण्यास नकार दिला. मात्र, घरातील ज्येष्ठांच्या मध्यस्थीनंतर हा विवाह कसा तरी पार पडला. (हेही वाचा: Fight Between Two Women Over Bus Seat: तेलंगणामध्ये बसच्या सीटवरून दोन महिलांमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल)
पहा व्हिडिओ-
A brawl erupted at a wedding when there were no chicken leg pieces in the biryani.
The groom & his wedding guests were severely beaten for #Chicken leg piece !
📌 Bareilly, Uttarpradesh
— Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) June 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)