Court Sentences Father To 101 Years In Jail: केरळमध्ये वडिलांचा पोटच्या मुलीवर 6 वर्षे बलात्कार; मुलगी गरोदर, कोर्टाने आरोपीला सुनावली 101 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
मोहम्मदला न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मोहम्मदवर सुमारे 6 वर्षांपासून आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदरही राहिली होती.
Court Sentences Father To 101 Years In Jail: केरळमधील मल्लपुरम येथील एका विशेष जलदगती न्यायालयाने मोहम्मद नावाच्या (आरोपीचे नाव बदलले आहे) 43 वर्षीय व्यक्तीला आपल्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 101 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मोहम्मदला न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मोहम्मदवर सुमारे 6 वर्षांपासून आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदरही राहिली होती. पोलिसांनी मोहम्मदविरुद्ध न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवत 101 वर्षांची शिक्षा सुनावली. गुन्हा दाखल झाला तेव्हा पीडितेचे वय 16 वर्षे होते. ती 10 वर्षांची असल्यापासून वडील मोहम्मद तिच्यावर अत्याचार करत होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पीडितेने तिच्या आजोबांनी देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला होता. (हेही वाचा: Massage Services at Candolim Beach: कँडोलिम बीचवर अनधिकृत मसाज सेवा; तीन महिलांवर गुन्हा दाखल)
पहा पोस्ट-
BREAKING: A Kerala Court has sentenced 43 year old Muhammed H., father of a minor girl who raped her for six years and finally impregnated her at 16, to 101 years in Jail along with a life imprisonment.
Court says the man deserves “no mercy”. pic.twitter.com/6zu58YHVly
— LawBeat (@LawBeatInd) July 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 07:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

