Arkansas Grocery Store Shooting: अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये गोळीबारात 4 ठार, 9 जखमी; मृतांमध्ये एका भारतीयांचाही समावेश
Gun Shot | Pixabay.com

Arkansas Grocery Store Shooting: अमेरिकेतील अर्कान्सास (Arkansas) मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अर्कान्सासमधील एका किराणा दुकानात गोळीबार (Firing) झाला. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आंध्र प्रदेशातील एका 32 वर्षीय व्यक्तीचाही समावेश आहे. बापटला जिल्ह्यातील दासरी गोपीकृष्ण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दासरी गोपीकृष्ण हे आठ महिन्यांपूर्वीच अमेरिकेला गेले होते.

दासरी गोपीकृष्ण हा आर्कान्सामधील फोर्डिस या छोट्याशा शहरातील मॅड बुचर किराणा दुकानात काम करत होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शुटिंगमध्ये त्याने आपला जीव गमावला. बंदुकधारीने दुकानात आणि पार्किंगमध्ये गोळीबार केल्याने चार जण ठार झाले आणि नऊ जण जखमी झाले. (हेही वाचा -New Jersey Crime: न्यू जर्सीमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीकडून महिलेची गोळ्या झाडून हत्या)

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दुकानात घुसून काउंटरवर असलेल्या व्यक्तीवर गोळीबार करताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, गोळी लागल्याने पीडित जमिनीवर पडला. यावेळी बिलिंग काउंटरवर उपस्थित असलेले गोपीकृष्ण यांना गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, गोपीकृष्ण यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. ही बातमी ऐकल्यानंतर गोपीकृष्ण यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. गोपीकृष्ण यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.