Photo Credit- X

Israel-Gaza Conflict: इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 30 पॅलेस्टिनी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय, 100 हून अधिक जखमी झाले. त्याबाबतची माहिती गाझा येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. 27 जुलै रोजी दुपारच्या वेळेत गाझा पट्टीतील देर अल-बालाह (Deir al-Balah)येथील फील्ड हॉस्पिटलवर इस्रायने बॉम्बहल्ला(Bomb Attack on Field Hospital) केला. हा एक विनाशकारी हलला होता. या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हे रुग्णालय खादीजा शाळेच्या आत स्थित होते. इस्रायली सैन्याने लढाऊ विमानांमधून तीन क्षेपणास्त्रांनी हॉस्पिटलवर बॉम्ब फेकले. हमास संचालित मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय पथकांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे आणि आरोग्य, वैद्यकीय साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. (हेही वाचा:Israel-Gaza Conflict: गाझा येथे शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 16 ठार, पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांची माहिती )

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने एका निवेदनात म्हटले आहे की अचूक गुप्तचरांच्या आधारे, इस्रायली वायुसेनेने मध्य गाझामधील खादीजा स्कूल कंपाऊंडमध्ये हमास कमांड आणि कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या "दहशतवाद्यांना" मारले.

"हमासच्या दहशतवाद्यांनी आयडीएफ सैन्य आणि इस्रायल राज्याविरूद्ध असंख्य हल्ले निर्देशित करण्यासाठी आणि योजना आखण्यासाठी लपण्याचे ठिकाण म्हणून कंपाऊंडचा वापर केला," IDF ने सांगितले की, स्ट्राइकपूर्वी, नागरिकांना इजा होण्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली होती.