Boy Shoots Himself With Father's Gun: अमेरिकेतील (America) लुईझियाना (Louisiana) राज्यात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांच्या मुलाने चुकून आपल्या वडिलांच्या बंदूक घेऊन स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. टँगीपाहोआ पॅरिश शेरीफ जेराल्ड स्टिकर यांनी सांगितले की, बंदूक बेडच्या बॉक्स स्प्रिंगमध्ये ठेवली होती. मुलाने याठिकाणी ठेवलेली बंदूक घेऊन स्वत:वर गोळी झाडली.
वडिलांनी सुरक्षेच्या कारणास्तव घरात बंदुक ठेवली होती. परंतु, घरात बंदुक ठेवणं या कुटुंबाला चांगलचं महागात पडलं आहे. आता, मुलाच्या वडिलांना निष्काळजीपणाच्या हत्येच्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते. अद्याप मुलाच्या वडिलांवर कोणतेही आरोप दाखल करण्यात आलेले नाहीत. (हेही वाचा - Bridge Collapses in China: चीनमध्ये पावसामुळे हाहाकार! पूल कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू; 30 बेपत्ता)
दरम्यान, अशाच प्रकारची घटना गेल्या महिन्यात घडली होती, जेव्हा एका तीन वर्षांच्या मुलाने मिडफिल्ड, अलाबामा येथे एका वाहनात बंदूक सापडल्यानंतर चुकून स्वतःच्या पायात गोळी झाडली. त्याला अलाबामाच्या चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तथापी, लुईझियानाच्या गुडबी येथे मंगळवारी एका वेगळ्या घटनेत, एका 15 वर्षांच्या मुलीला अपघाताने गोळी लागली. बुधवारी तिचा मृत्यू झाला. मुलगी लिव्हिंग रुममध्ये बसली होती. यावेळी घरातील व्यक्तीकडून दुसऱ्या खोलीत बंदुक हाताळत असताना चुकून गोळीबार झाला होता. (हेही वाचा - (हेही वाचा - Cargo Ship Fire: गोव्यात समुद्राच्या मध्यभागी मालवाहू जहाजाला भीषण आग; 12 तासांपासून 3 अग्निशमन ICG जहाजे तैनात (Watch Video))
याव्यतिरिक्त, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10:30 च्या सुमारास लाफायट येथील एका घरात 4 वर्षांच्या मुलावर गोळ्या झाडण्यात आल्या, परंतु अद्याप कोणताही तपशील समोर आलेला नाही. तथापी, मे महिन्यात, मिशिगनमध्ये एका दोन वर्षांच्या मुलाने 40-कॅलिबर हँडगनने स्वत: च्या डोक्यात गोळी झाडली होती. मिशिगनच्या सुरक्षित स्टोरेज कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मुलाच्या वडिलांसह तीन जणांवर आरोप करण्यात आले होते.