Photo Credit -X

Israeli Gaza Conflict: इस्रायलने शनिवारी दक्षिण गाझामध्ये हवाई हल्ला (Israeli Airstrikes)केला. यात किमान 22 ठार झाल्याची माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली. गाझा शहरातील विस्थापित लोकांना आश्रय देणाऱ्या शाळेत(Gaza School)हा हल्ला झाला. हमास या दहशतवादी गटाच्या कमांड सेंटरला लक्ष्य करण्यासाठी ही हल्ला करण्यात आल्याचे इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आले. मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे सैनिकांनी सांगितले.

हमास संचालित सरकारी मीडिया कार्यालयाने सांगितले की, मृतांमध्ये १३ मुले आणि ६ महिलांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या साक्षिदारांनी घडलेल्या दुर्घटनेची माहिती दिली. "महिला आणि मुले शाळेच्या मैदानात बसली होती, मुले खेळत होती आणि अचानक दोन रॉकेट त्यांच्यावर आदळले," असे एका साक्षीदाराने सांगितले. साइटवरील आढळलेल्या रॉयटर्सच्या फुटेजमध्ये स्फोट झालेल्या भिंती, उद्ध्वस्त झालेले आणि जळलेले फर्निचर अशी दृश्ये समोर आली आहेत. (हेही वाचा: Israel-Gaza Conflict: गाझा येथे शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 16 ठार, पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांची माहिती)

एका निवेदनात, इस्रायली सैन्याने म्हटले आहे की मे महिन्यापासून राफाहमध्ये कार्यरत असलेल्या सैन्याने आठवड्याभरात डझनभर अतिरेकी मारले. लष्करी पायाभूत सुविधा आणि बोगद्याचा नाश केला. हमासचे म्हणणे आहे की युद्ध संपवण्यासाठी आणि इस्रायली सैन्याला गाझामधून बाहेर काढण्याच्या करारावर लक्ष केंद्रित केले आहे, तर इस्रायलचे म्हणणे आहे की हमासचा नायनाट झाल्यावरच युद्ध संपू शकते. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांसाठी इस्रायली ओलीसांची देवाणघेवाण हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.