इस्राईलने शनिवारी रात्री आणि रविवारी गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. माध्यमांनी आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली याबद्दलची माहिती दिली आहे. इस्राईलने राफा आणि खान युनिस येथे हवाई हल्ले केले. या हल्ल्यात राफा येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला आणि तीन मुलांचा समावेश असल्याचे माध्यमांनी सांगितले. अल्जेरियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये इस्राईल-हमास दरम्यान युद्ध थांबविण्याबाबत मांडलेला ठराव अमेरिकेने फेटाळला आहे. (हेही वाचा - Israel-Hamas War: गाझामधील सुमारे 70 टक्के घरांचे नुकसान, अहवालातून माहिती समोर)
मागील दोन महिन्यांपासून इस्राईलने या दोन शहरांना लक्ष्य केले आहे. त्याच प्रमाणे गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात गाझा शहरातील जवळपास निम्म्या इमारती आणि जवळपास 70 टक्के घरे खराब झाली आहेत किंवा नष्ट झाली आहेत, असे टाईम्स ऑफ इस्रायलने वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचा हवाला देत वृत्त दिले आहे. अहवालात पट्टीच्या उपग्रह छायाचित्रणाचे विश्लेषण आणि इतर रिमोट सेन्सिंग पद्धतींचा उल्लेख केला आहे.
गाझा मधील नासेर रुग्णालयावर मागील आठवड्यात इस्राईलच्या सैन्याने केलेल्या कारवाईमुळे आता या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या(डब्लूएचओ) वतीने देण्यात आली आहे. ‘डब्लूएचओ’चे अध्यक्ष डॉ. डॉ टेड्रोस अधानोम घेब्रायसिस यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.