Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Afghanistan Blast: अफगाणिस्तान (Afghanistan) च्या समांगन प्रांतातील ऐबक शहरातील जाहदिया मदरशात बुधवारी दुपारी बॉम्बस्फोट (Blast) झाला. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले. हा स्फोट दुपारच्या प्रार्थनेनंतर झाला, असे एका आघाडीच्या अफगाण मीडिया गटाने प्रांतीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे.

तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर अफगाणिस्तानमधील एका मदरशात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान दहा विद्यार्थी ठार झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटाबाबत सुरक्षा अधिकार्‍यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. स्फोटानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (हेही वाचा - Afghanistan: अफगानिस्तानधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी दाढी ठेवण्यासाचा तालीबानचा फतवा)

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या प्रार्थनेदरम्यान हा स्फोट झाला. स्फोटानंतर 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, 27 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर ठार झालेल्या एकूण लोकांमध्ये सुमारे 10 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. (हेही वाचा - Afghanistan: तालिबानच्या राजवटीमध्ये लोकप्रिय टीव्ही अँकरवर आली स्ट्रीट फूड विकण्याची वेळ (See Photos))

दरम्यान, 15 ऑगस्ट 2021 पासून अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबान सातत्याने देशात शांतता प्रस्थापित करण्याचा दावा करत आहे, परंतु हल्ल्यांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये मोर्टार शेलचा स्फोट झाला होता. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत निवेदनानुसार हा स्फोट दहशतवादी हल्ला नव्हता.