Thailand Pub Fire: थायलंडमध्ये एका पबला भीषण आग, 13 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जण जखमी
Mountain Bee Pub (Photo Credit: Twitter)

पूर्व थायलंडच्या (Thailand) चोनबुरी (Chonburi) प्रांतातील एका पबला (Pub) लागलेल्या भीषण आगीत (Fire) किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बँकॉक पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सट्टाहिप (Sattahip) जिल्ह्यातील माउंटन बी पबमध्ये (Mountain Bee Pub) ही घटना घडली. इतर माध्यमांच्या वृत्तानुसार, बळींच्या यादीत आतापर्यंत एकही परदेशी नागरिक नाही.  इंटरनेटवर फिरत असलेल्या फुटेजमध्ये लोक सुरक्षिततेसाठी धावताना आणि ओरडताना दिसत आहेत. काही जण तर ज्वालांमध्ये लपेटलेले शरीर घेऊन धावताना दिसले. याप्रकरणी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. हेही वाचा OMG: सेक्स करताना फ्रॅक्चर झाला पुरुषाचा Private Part; लघवी थांबली, रक्तस्त्राव सुरु झाला, उद्भवली Eggplant Deformity ची समस्या

पोलीस कर्नल वुटीपॉन्ग सोमजाई यांनी सांगितले की, सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट क्लबमध्ये 1.00 वाजता (1800 GMT गुरुवारी म्हणजे 11.30 वाजता IST) आग लागली आणि आतापर्यंत सर्व बळी हे थाई नागरिक होते.