Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Murder For iPhone : आयफोनची क्रेझ ही जगभरात आहे. ती कमी होताना दिसत नाहीये. महागडा आयफोन आपल्याकडे असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण याच आयफोनच्या वेडामुळे एका 12 वर्षांच्या मुलीने तिच्या 8 वर्षांच्या लहान चुलत बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील टेनेसीमध्ये (Tenancy in the United States) एका 12 वर्षांच्या मुलीने आयफोनसाठी आपल्याच 8 वर्षांच्या बहिणीचा गळा दाबून खून केला. एवढंच नाही तर तिने पकडले जाऊ नये म्हणून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्हीच्या तपासल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. (हेही वाचा:Chinese Woman Dies From Overeating: लाइव्ह इटिंग चॅलेंज दरम्यान 24 वर्षीय चिनी तरुणीचा मृत्यू; 10 किलोपेक्षा जास्त अन्न पोटात साठल्याचा धक्कादायक खुलासा )

डेमारिया हॉलिंग्सवर्थ असं 8 वर्षांच्या मृत मुलीचे नाव आहे. आयफोनवरून या दोघी बहिणींमध्ये भांडण झाले होते. त्या दरम्यान रागाच्या भरात मोठ्या बहिणीने हे कृत केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगी ही मृत मुलीची चुलत बहीण आहे. तिच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. आरोपी मुलगी ही अल्पवयीन असली तरी तिच्यावर खून आणि पुराव्याशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा:Sex With Soldiers For Food: अन्नासाठी महिलांना सैनिकांसोबत सेक्स करण्यास भाग पाडले जाते; पोट भरण्यासाठी होतो शरीराचा व्यापार, अहवालात धक्कादायक खुलासा)

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यात आरोपी मुलगी तिची बहीण डेमरिया हिचा गळा दाबताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुटीत आरोपी मुलगी तिच्या आजीकडे राहण्यासाठी आली होती. आयफोनवरून दोन बहिणींमध्ये खूप भांडण व्हायचे. पण त्याचे परिणाम इतके वाईट होऊ शकतात, याचा विचार कोणी केला नव्हता. गळा आवळल्यानंतर आरोपी तरुणीने आपल्या बहिणीचा मृतदेह बेडवर अशा प्रकारे ठेवला की जणू ती झोपली आहे.

आरोपी मुलगी खूपच लहान आहे, पण तिने हिंसक कृत्य केले आहे. आरोपी मुलीवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवावा असे फिर्यादी पक्षाचे मत आहे. ती दोषी आढळल्यास तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी चर्चा आहे.