गोविंदांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवासाठी अनेक विम्यांची घोषणा अगोदरच केली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी संदर्भात आणखी अनेक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.