पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) यांना डावलण्यात आल्याने नाउमेद झालेले वनगा मागील 12 तासांपेक्षा जास्त कालावधी पासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फोन वरून संपर्क साधला आहे. श्रीनिवास हे आपल्याला डावलण्यात आल्याने खचले आहेत. अन्न, पाणी घेत नाहीत तसेच सतत रडत असल्याचं त्यांच्या पत्नी एकनाथ शिंदे यांना म्हणाल्या आहेत. दरम्यान मीडीयाशी बोलताना त्यांनी वनगा ड्रायव्हर शिवाय बाहेर पडले आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद असल्याचं सांगितलं आहे. सध्या पोलिस श्रीनिवास वनगा यांचा शोध घेत आहेत तसेच त्यांच्या घराबाहेर देखील बंदोबस्त वाढवला आहे.
श्रीनिवास वनगा यांनी उमेदवारी डावलल्यानंतर प्रतिक्रिया देताना रडताना दिसले. शिंदेंनी शब्द पाळला नाही असे आरोप श्रीनिवास वनगा यांनी केले आहे. उद्धव ठाकरे देवमाणूस आहे आता त्यांची माफी मागायलाही कसा जाऊ? असा प्रश्न उद्विग्न होऊन विचारला आहे. वनगा यांना भाजपा कडून डहाणू मधून उमेदवारी मिळेल अशी आशा होती पण तेही नाव जाहीर न झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. डहाणूची उमेदवारी भाजपाने विनोद मेढा यांना दिली आहे. तर पालघर मध्ये माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जाहीर केली 15 उमेदवारांची तिसरी यादी; मुंबादेवी येथून Shaina NC यांना उमेदवारी .
शिवसेना पक्षामध्ये पक्षामध्ये फूट पडल्यानंतर सुरतला मोजक्या आमदारांसह निघताना श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण इतरांना सांगून पलायन करण्यात आले होते. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे शिंदे यांच्यासोबत राहिले होते. आता विधानसभेत डावलले असले तरीही विधान परिषदेतून सभागृहात घेतलं जाईल असे शिंदे वनगा यांच्या पत्नीला म्हणाले आहेत.