Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जाहीर केली 15 उमेदवारांची तिसरी यादी; मुंबादेवी येथून Shaina NC यांना उमेदवारी

शिवसेनेच्या शिंदे गटाने आपल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेचे 13 आणि मित्रपक्षांचे 2 उमेदवार आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जाहीर केली 15 उमेदवारांची तिसरी यादी; मुंबादेवी येथून Shaina NC यांना उमेदवारी
CM Eknath Shinde | Photo Credit- X

Shivsena Candidate 3rd List: यंदाच्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे सत्र सुरु आहे. शिवसेनेने (शिंदे गट) सोमवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. शिवसेनेच्या शिंदे गटाने आपल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेचे 13 आणि मित्रपक्षांचे 2 उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने मुंबादेवी येथून शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या भाजपच्या नेत्या आहेत, मात्र शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. याआधी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 20 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. या यादीत संजय निरुपम यांना दिंडोशी आणि मिलिंद देवरा यांना वरळीतून तिकीट देण्यात आले आहे. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा रिंगणात उतरणार आहेत. दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील चार जागांवर भाजपचे मित्रपक्ष निवडणूक लढवणार, यादी जाहीर)

शिवसेना एकनाथ शिंदे गट उमेदवारांची तिसरी यादी-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2024 11:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).