अभिनेता किच्चा सुदीपने एका लॉंच इव्हेंटमध्ये म्हटले की, "हिंदी आता राष्ट्रभाषा नाही." त्याच्या या वक्तव्यावर अजय देवगनने ट्विट करून निशाणा साधला. अजय देवगनने ट्विट केले की, "सुदीप, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन."