Zomato (photo credit- ANI)

ऑनलाईन फूड डिलेव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने आज (25 नोव्हेंबर) एक मोठी घोषणा केली आहे. यामध्ये आता झोमॅटो आपली सेवा हिंदी (Hindi), मराठी (Marathi) सह अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही देणार आहे. अन्य भाषांमध्ये बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तमिळ, तेलगू चा समावेश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार त्यांच्याकडून 1,50,000 ऑर्डर्स या झोमॅटो अ‍ॅप वर प्रादेशिक भाषेमधून एका महिन्यात आल्या आहेत.

सध्या हिंदी आणि तमिळ यांच्या मिळून 54% ऑर्डर्स आहेत. सध्या झोमॅटो कडून भारतातील 1 हजारांपेक्षा अधिक शहरांत सेवा दिली जाते. झोमॅटो ला प्रादेशिक भाषेमध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही आमची सुरूवात आहे पण मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आम्हांला आमची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करणारी आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा एकत्रित निव्वळ तोटा सप्टेंबरच्या तिमाहीत रु. 251 कोटी इतका कमी झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत रु. 430 कोटी होता. हे देखील नक्की वाचा: Zomato Layoffs: Amazon, Facebook नंतर आता Zomato करणार कर्मचारी कपात; 3 टक्के कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ .

मागील वर्षीच्या 1,024 कोटी रुपयांच्या तुलनेत महसूल 1,661 कोटी रुपयांवर गेला आहे, जी लक्षणीय 62.2 टक्क्यांनी वाढली आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. "ही पहिली तिमाही आहे जिथे आम्ही अब्ज डॉलर्सचा वार्षिक कमाईचा टप्पा ओलांडला आहे" असेही झोमॅटो म्हणाले आहेत. ब्लिंकिटचे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) तिमाही-दर-तिमाही 26 टक्क्यांनी वाढून रु. 14.82 अब्ज झाले तर महसूल तिमाही-दर-तिमाही 44 टक्क्यांनी वाढला आहे. "अ‍ॅडजस्ट केलेला EBITDA तोटा मागील तिमाहीत (Q1FY23) 3.26 अब्ज रुपयांवरून 2.59 अब्ज रुपयांपर्यंत कमी झाला," असेही कंपनीने म्हटले आहे.