Xiaomi कंपनीचा Mi 11 Lite लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या संभाव्य किंमतीसह खासियत
Smartphone (Photo Credit: Micromax)

शाओमी  (Xiaomi) कंपनीचा अपकमिंग स्मार्टफोन Mi 11 Lite भारतात लॉन्च करण्याबद्दल प्रतीक्षा केली जात आहे. या आगामी स्मार्टफोन बद्दल काही रिपोर्ट्स सुद्धा लीक झाले आहेत. अशातच आता कंपनीच्या ग्लोबल VP आणि MD मनु कुमार जैन यांनी ट्विट करत एक डिवाइसच्या लॉन्चिंगचे संकेत दिले आहेत. एमआय सीरिज अंतर्गत Mi 11 Ultra सह Mi 11X आणि Mi 11X Pro सारखे शानदार स्मार्टफोन ग्लोबल बाजारात उतरवण्यात आले आहेत. शाओमीचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटमध्ये Lite शब्दाचा वापर केला आहे. यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, हे डिवाइस Mi 11 Lite असणार आहे. मात्र त्यांनी डिवाइसच्या लॉन्चिंग तारीख, किंमत बद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही.

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G प्रोसेसर दिला जाणार आहे. त्याचसोबत या डिवाइसमध्ये 6.55 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि 4250mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये पहिला 64MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा 5MP ची टेलिफोटो लेन्स दिली जाणार आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला 16MP चा कॅमेरा मिळणार आहे.(Realme Anniversary Sale सुरु; रियलमीच्या 'या' प्रॉडक्ट्सवर मिळवा जबरदस्त सूट)

लीक रिपोर्ट्सनुसार, Mi 11 Lite  स्मार्टफोनची किंमत 20 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. त्याचसोबत काही कलर ऑप्शनसुद्धा भारतीय बाजारात उपलब्ध करुन दिले जाऊ शकतात. सध्या कंपनीकडून अद्याप एमआय 11 लाइटच्या लॉन्चिंग बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, Mi Ultra हा स्मार्टफोन एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. या फोनची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली होती. यामध्ये 6.81 इंचाचा E4 एमोलेड क्यूएचडी प्लस डिस्प्ले दिला असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz  आहे.  त्याचसोबत स्क्रिनच्या सुरक्षिततेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus दिला आहे. तसेच युजर्सला डिवाइसमध्ये क्वालकॉम Snapdragon 888 प्रोसेसर मिळणार आहे. तर एमआय 11 अल्ट्रा अॅन्ड्रॉइड 11 आधारित MIUI 12 वर काम करणार  आहे.