Xiaomi Republic Day Sale 2021 | (Photo Credits: MI officical Website)

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाओमी ने सेलची घोषणा केली आहे. Xiaomi Republic Day Sale 2021 20 जानेवारी पासून सुरु झाला असून सेलची सांगता 24 जानेवारी रोजी होणार आहे. या सेल अंतर्गत शाओमीच्या (Xiaomi) विविध प्रॉडक्ट्सवर डिल्स, ऑफर्स  देण्यात येत आहेत. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Mi.com वरुन तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता.

शाओमीच्या गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम व्हिआयपी क्लब मेंबर्स या सेलच्या सर्व ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. या सेल अंतर्गत शाओमीच्या लॅपटॉप, फोन्स आणि इतर अॅक्सेसरीजवर विविध डिस्काऊंट्स पाहायला मिळणार आहेत. अॅक्सिस बँकच्या ग्राहकांना या सेल अंतर्गत डेबिट कार्ड वापरल्यास 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि क्रेडिट कार्ड वापरल्यास 1250 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक मिळण्यासाठी कमीत कमी 9000 रुपयांची खरेदी करणे आवश्यक आहे.

शाओमीच्या रिपब्लिक डे सेल अंतर्गत वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर 8000 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. तर शाओमीच्या लॅपटॉप्सवर 10000 पर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो. शाओमीने नुकत्याच लॉन्च केलेल्या स्मार्ट टीव्हीवर देखील 6000 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच रेडमी पॉवर बँक्स, रेडमी ईयर बर्ड्स एस, एमआय वॉच, एमआय स्मार्टबँड आणि एमआय वॉटर प्युरी फायर या प्रॉडक्ट्सवर देखील सूट मिळेल. या सोबत एमआय टीव्ही स्टीक आणि एमआय बॉक्स 4k यावर 500 आणि 200 रुपयांचा डिस्काऊंट दिला जाईल. (Republic Day Sale 2021: अॅपल iPhone 12 सिरीज 48,900 रुपयांपासून IndiaiStore वर उपलब्ध; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स)

या सेल अंतर्गत रेडमी नोट 9 प्रो (4GB+128GB) आणि रेडमी नोट 9 प्रो मॅक्स (6GB & 128 GB) अनुक्रमे 13,999 आणि 17,499 रुपयांना उपलब्ध असतील. यासोबतच एमआय.कॉम आणि एमआय होमच्या स्मार्ट होम प्रॉडक्ट्स यामध्ये एमआय होम सिक्युरीटी कॅमेरा 360, एमआय एलईडी स्मार्ट कलर ब्लप, एमआय स्मार्ट एलईडी ब्लप, एमआय मोशन अॅक्टीव्हेटेट नाईट लाईट हे होम प्रॉडक्ट्स 4198 रुपयांच्या डिस्काऊंडेट किंमतीत उपलब्ध असतील.