चीनी (China) स्मार्टफोन कंपनी Xiaomi यांनी काही वेळापूर्वीच Redmi 7 भारतात (India) लॉन्च करण्यात आला आहे. तर 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनसाठी पहिल्या सेलसाठी सुरुवात झाली आहे. तुम्हाला जर रेडमी 7 खरेदी करायचा असल्यास तुम्हाला तो ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन ऑलराऊंडर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Redmi 7 मधील 2GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनसाठीची किंमत 7,999 रुपये आहे. तर 3GB RAM आणि 32GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी 8,999 रुपये किंमत आहे. एक्लिप्स ब्लॅक, कॉमेट ब्लू आणि लूनर रेड रंगामध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना 2400 रुपयांच्या कॅशबॅकसह 4 वर्षांपर्यंत डबल डेटा ऑफर देण्यात येत आहे.(ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह लॉन्च होणार OnePlus 7 Pro; पहा काय आहे या स्मार्टफोनची खासियत)
यामध्ये 6.26 इंचाचा एचडी,एलसीटी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तर गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. स्नॅनड्रॅगन 632 प्रोसेसरपेक्षा कमी आहे. तसेच 400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोसाठी 12 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा दिला आहे.