Xiaomi ने आपला नवा लॅपटॉप (Laptop) Mi Notebook 14 (IC) भारतात लाँच केला आहे. Xiaomi चा हा लॅपटॉप 10th Gen Intel Core i5 प्रोसेसर आणि 720p HD वेबकॅमसह लाँच केला आहे. शाओमीचे आतापर्यंत आलेले लॅपटॉप्स भारतीय बाजारात लोकप्रिय झाले आहेत. या लॅपटॉपमध्येही असे आकर्षक फिचर्स देण्यात आले आहे. या लॅपटॉपची किंमत 43,999 रुपयांपासून सुरु होते. यात अनेक जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.
या लॅपटॉपची स्क्रीन 14 इंचाची असून यात 1080p रिजोल्युशन आहे. याचा रेश्यो 16:9 इतके आहे. भारतात हा Mi Notebook 14 (IC) लॅपटॉप 3 प्रकारात लाँच करण्यात आला आहे. यात 8GB रॅम+256GB SSD स्टोरेज आणि UHD ग्राफिक्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेज वेरियंटे दोन वेगवेगळे ग्राफिक कार्ड देण्यात आले आहे. Xiaomi Mi Notebook 14 (IC)ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.हेदेखील वाचा- Volume Pop Up on Screen: तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर स्क्रिनवर वॉल्यूम पॉप अप येतो का? Windows 10 मध्ये अशी दूर करा समस्या
Introducing Mi Note Book 14 IC!
- 10th Gen Intel® Core™ i5
- 256GB/512GB SSD
- In-built Webcam
Starting from ₹4️⃣3️⃣9️⃣9️⃣9️⃣
Get yours from https://t.co/D3b3QtmvaT, @amazonIN or @Flipkart.
RT to spread the word. pic.twitter.com/2swl1y2AeN
— Mi India #Mi10i is Here! (@XiaomiIndia) January 19, 2021
याच्या Navia MX 2.0 ला 49,999 रुपये आणि UHD Graphics चे मॉडल 46,999 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप mi.com, Mi Homes, Amazon India, Flipkart आणि प्रमुख रिटेल आऊटलेट्समध्येही खरेदी करु शकता.
कनेक्टिव्हिटी तुम्हाला या लॅपटॉपमध्ये वायफाय 802.11ac module, ब्लूटुथ 5.0, तीन युएसबी पोर्ट, एक HDMI पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.