Xiaomi Mi 11 Ultra चा 7 जुलै रोजी सेल; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि खासियत
Mi 11 Ultra (Photo Credits: Xiaomi India)

एमआय इंडियाचा (Mi India) स्मार्टफोन एमआय 11 अल्ट्रा (Mi 11 Ultra) चा 7 जुले रोजी ऑनलाईन सेल (Online Sale) आहे. दुपारी 12 पासून या सेलला सुरुवात होईल. 69,990 रुपये किंमत असलेला एमआय अल्ट्राचा लिमिडेट फर्स्ट सेल (Mi 11 Ultra Limited First Sale) काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. ग्राहकांना Mi.com या वेबसाईटवर 1999 रुपयांचे 'अल्ट्रा गिफ्ट कार्ड' (Ultra Gift Card) खरेदी करावे लागेल. ज्याचा वापर ते नंतर एमआय 11 अस्ट्रा विकत घेताना करु शकतील.

हा मोबाईल विकत घेतल्यानंतर तुम्हाला दोनदा स्क्रीन रिप्लेस करुन मिळेल. एमआय इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर मनू कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियम स्मार्टफोनमध्ये असलेले सर्व फिचर या मोबाईलमध्ये देण्यात आले आहेत.

आम्ही या नव्या स्मार्टफोनमधून ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

Mi 11 Ultra (Photo Credits: Xiaomi India)
Xiaomi Mi 11 Ultra (Photo Credits: Xiaomi)

या स्मार्टफोनमध्ये प्रो-ग्रेड प्रायमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात असलेले तीन कॅमेरे 50MP+48MP+48MP चे असतील. GN2 camera sensor, Dual Pixel Pro आणि इतर फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे या मोबाईलच्या कॅमेराचा अनुभव तुम्हाला DSLR कॅमेऱ्यासारखा येईल. Mi 11 Ultra या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर दिला असून यासोबत heat-dissipation स्ट्रॅक्चर दिल्यामुळे मोबाईलचा परफॉर्मन्स अजून वाढला आहे. यामध्ये शाओमीने बनवलेली नवी ट्रि-फेज टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.