Twitter New Logo X: एलोन मस्क (Elon Musk) यांनी 2022 मध्ये ट्विटर विकत घेतले. त्यानंतर त्यांनी या मायक्रो ब्लॉगिंग साइटमध्ये अनेक बदल केले आहेत. मस्क यांनी अनेक ब्लॉक केलेली खाती पुन्हा सुरू केली. तसेच सर्व जुन्या निळ्या टिक्स काढल्या गेल्या आणि ब्लू टिक सब्सक्रिप्शन सेवा सुरू करण्यात आली. ज्यामुळे कोणताही वापरकर्ता दरमहा एक हजार रुपये देऊन ब्लू टिक खरेदी करू शकतो. ब्लू टिक वापरकर्त्याला ट्विट एडिटिंगसह अनेक सुविधा मिळतात. आता एलॉन मस्क ट्विटरचा लोगो ब्लू बर्डवरून बदलून एक्स करणार आहे.
एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, ते लवकरच ट्विटर लोगो ब्लू बर्ड वरून एक्समध्ये बदलणार आहे. याशिवाय इलॉन मस्क यांनी एक पोल केला आहे. यामध्ये युजर्सना विचारण्यात आले आहे की प्लॅटफॉर्मचा डिफॉल्ट रंग निळ्यावरून काळ्या रंगात बदलायचा की पांढरा. आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांनी या मतदानात भाग घेतला आहे. आतापर्यंत 74.8 टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे. (हेही वाचा - Twitter DM Limit: ट्विटर ची डायरेक्ट मेसेज' संदर्भात नवीन पॉलिसी)
एलोन मस्क आणि Twitter New Logo X -
एलोन मस्कचा X अक्षराशी 24 वर्षांचा संबंध आहे. 1999 मध्ये, एलोन मस्कने ऑनलाइन बँकिंग कंपनी x.com ची स्थापना केली. नंतर त्यांनी ही कंपनी PayPal सोबत घेतली. 2017 मध्ये, एलोन मस्कने पुन्हा एकदा PayPal च्या वेबसाइटची URL x.com विकत घेतली. त्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विट केले होते की ते या डोमेनशी भावनिकदृष्ट्या खूप जोडलेले आहेत. याआधी एलोन मस्कने आपल्या कुत्र्याचा ट्विटरचा लोगो बनवला होता. नंतर जुना लोगो पुन्हा पूर्ववत करण्यात आला होता.
दरम्यान, एलोन मस्क यांनी 2022 मध्ये ट्विटर विकत घेतले. यानंतर त्यांनी प्रथम सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मे 2023 मध्ये, एलोन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची ट्विटरची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली. यानंतर ते स्वतः कार्याध्यक्ष झाले.