Asteroid 1998 OR2: वेगाने पुढे सरकतोय Asteroid, 29 एप्रिलच्या सकाळी पृथ्वीच्या जवळून जाणार; जाणून घ्या काय आहे ही खगोलीय घटना
Chandryaan 2 Sends Images Of Earth (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याच दरम्यान अशी बातमी समोर येत आहे की जे ऐकून तुमच्या भुवया उंचावल्या जातील. एका बाजूला डॉक्टर्स आणि वैज्ञानिक कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी औषधाचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला पृथ्वीला धोका पोहचेल अशी गोष्ट त्याच्या नजीक येत आहे. असे ही बोलले जात आहे की, आकाशगंगामध्ये काही हालचाली होत आहेत. याच कारणास्तव एक अॅस्टरॉइड पृथ्वीच्या बाजूने जाणार असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियात असा दावा केला जात आहे की, हा अॅस्टरॉइड माउंट एवरेस्टपेक्षा ही सर्वाधिक मोठा आहे. तो प्रचंड वेगाने आल्यानंतर पृथ्वीच्या एखाद्या भागासोबत त्याची टक्कर झाल्यास मोठी त्सुनामी येण्याची शक्यता आहे. ऐवढेच नाही तर काही देश सुद्धा उद्धस्त करु शकते अशी ही चर्चा आहे.

Massive Asteroid 1998 OR2 असे त्याला नाव देण्यात आले असून बुधवारी (29 एप्रिल) सकाळी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, यामुळे मोठे संकट येऊ शकते असा दावा केला जात आहे. जवळजवळ 1.2 मील लांब असा अॅस्ट्रॉइड जगभरातील वैज्ञानिकांचे लक्ष वेधून घेत आहे. NASA चे सुद्धा याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. या अॅस्ट्रॉइचा वेग 19, 000 किमी प्रति तास आणि याच वेगाने तो पुढे सरकरत आहे. हा अॅस्ट्रॉइड प्रथम 1998 मध्ये दिसला होता.(Pink Super Moon: आज दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद, रंगही बदलणार; जाणून घ्या वेळ व नक्की काय ही घटना)

वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, जरी तो आकारने मोठा आहे. मात्र या अॅस्ट्रॉइड पासून घाबरण्याची काही गरज नाही आहे. कारण हा पृथ्वीपासून लांब अंतरावरुन जाणार आहे. अॅस्ट्रॉइड पृथ्वीपासून 1.8 मिलियन किमी दूर जाणार आहे. त्यामुळे जर कोणी एखादा 29 एप्रिलला पृथ्वीचा नाश होणार असल्याचे म्हणत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.