जर तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये विंडोज 7 चा वापर करत असल्यास तर ही बातमी जरुर वाचा. कारण मायक्रोसॉफ्ट कंपनीने कप्युटर आणि लॅपटॉपसाठीचे अपडेट देणे आता बंद केले आहे. मात्र विंडोज 7 बंद करण्यामागील कारण म्हणजे कंपनी आता सध्या विंडोज 10 वर फोकस केला जाणार आहे. 14 जानेवारी नंतर विंडोत 7 मधील सपोर्ट करणे बंद होणार आहे. अपडेट बंद झाल्यानंतर तुमचा पीसी बंद होईल पण कंपनी कोणतेही अपडेट देणार नाही. त्यामुळे वायरसचा अटॅक होणे सहज शक्य होणार आहे.
मायक्रोसॉक्टच्या सपोर्ट वेब पेज वरुन असे स्पष्ट झाले की, काही तांत्रिक कारणास्तव अधिक फोकस केला जाणार आहे. त्यामुळे विंडोज युजर्सला अधिक उत्तम अनुभव मिळणार आहे. त्यामुळे कंपनीने एका सुचनेच्या माध्यमातून असे सांगितले आहे की, जानेवारी 2020 संपण्यापूर्वीच विंडोज 10 डाऊनलोड करावे.(नवीन वर्षापासून लागू होणार 'हे' 8 नवे नियम; जाणून घ्या काय होणार परिणाम)