प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी थोडा काळावधी राहिला आहे. त्यामुळे या नवीन वर्षापासून अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. सरकार विविध प्रकारच्या नियमांत नवीन वर्षापासून बदल करणार आहे. नवीन वर्षांत केवळ कालनिर्णय बदलत नसते. सरकार अर्थिक तसेच विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण नियम आणि योजना लागू करत असते. याचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होत असतो. सरकारने 2020 पासून काही नियमांमध्ये बदल करावयाचे ठरवले आहे. या बदललेल्या नियमांचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर पडणार आहे. आज आपण या लेखातून अशाच 8 नियमांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात नव्या वर्षांत होणाऱ्या 'या' 8 महत्त्वपूर्ण बदलाविषयी...

1. पॅन-आधार लिंकिंग -

पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबर 2019 पर्यंत आहे. यासंदर्भात प्राप्तीकर विभागाने एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांना पॅन आधार लिंक करण्याबाबत सतर्क केले आहे. त्यामुळे जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत पॅन-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड निरोपयोगी ठरणार आहे. (हेही वाचा - PAN-Aadhaar Card Linking: 31 डिसेंबर च्या आधी पॅन-आधार कार्डशी लिंक करणे आहे अनिवार्य; 'या' सोप्प्या स्टेप्स वापरून आजच पूर्ण करा काम)

2. बँका NEFT ची सेवा निशुल्क पुरवणार -

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने NEFT मार्फत होणाऱ्या निधी हस्तांतरणावर (फंड ट्रान्सफर) बँकांना आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. 1 जानेवारी 2020 पासून देशातील सर्व बँकामध्ये हा नियम लागू होणार आहे.

3. रूपे कार्ड आणि UPI व्यवहार मोफत -

1 जानेवारी 2020 पासून 50 कोटी रुपये उलाढाल असलेल्या कंपन्याचा व्यापारी सवलत दराचा बोझा सरकार उचलणार आहे. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये व्यवहारासाठी डेबिड कार्ड (रुपे) आणि UPI व्यवहारासाठी नव्या वर्षांत अतिरिक्त पैसा मोजावा लागणार नाही.

4. EPFO सदस्यांसाठी खास सेवा -

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्याला कर्मचारी पेन्शन योजनेच्या 'कम्युटेशन' सेवा सुरू करण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून भविष्य निर्वाह निधीमधून आगाऊ रक्कमेचा ठराविक हिस्सा (अॅडव्हान्स) काढता येणार आहे.

5. SBI ATM मध्ये नव्या पद्धतीचा वापर -

एसबीआय बँकेने वन टाइम पासवर्ड (OTP) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसबीआय ग्राहकांना ATM मधून पैसे काढताना आपल्या मोबाईलवर OTP येणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे. 1 जानेवारीपासून ही सुविधा लागू करण्यात येणार आहे. 10 हजारपेक्षा अधिक व्यवहारासाठी या सेवेचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

6. ही डेबिट कार्ड निरोपयोगी होणार -

एसबीआयने मॅग्नॅटिक ATM बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकारचे ATM वापरणाऱ्यांनी सतर्क होण्याची आवश्यकता आहे. तुम्ही बँकेतून ATM बदलून घेतले नसेल तर ऐनवेळी तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Aadhar Card New Rule: आय-टी रिटर्न भरताना चुकीचा आधार तपशील दिल्यास होणार 10,000 रुपयांचा दंड

7. आधारवरून GST नोंदणी -

वस्तू कर सेवा (जीएसटी) नोंदणी सुलभ करण्यासाठी आधार उपयुक्त ठरणार आहे. 1 जानेवारीपासून आधारच्या माध्यमातून जीएसटी नोंदणी करणे शक्य होणार आहे.

8. अरुंधती सुवर्ण योजनेअंतर्गत लग्नात मुलीला मिळणार 1 तोळा सोनं -

आसाम सररकारने 'अरुंधती सुवर्ण योजने'च्या माध्यमातून मुलींच्या लग्नासंदर्भात विशेष तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत 10 पर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि लग्नासाठी नाव नोंदणी केलेल्या मुलींना सरकार लग्नामध्ये 1 तोळा सोनं देणार आहे. 18 ते 21 वय असलेल्या आणि ज्या मुलीच्या कुटुंबियांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.