तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी जास्त चॅट करतो, जाणून घ्या या ट्रिकने
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

जगात तब्बल 150 करोडपेक्षा जास्त लोक इंस्टंट मेसेजिंग अॅप, व्हॉट्पअॅप (Whatsapp) चा वापर करतात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार सोशल मिडियाच्या विश्वात व्हॉट्पअॅप हे 4 थ्या क्रमांकावर आहे. व्हॉट्पअॅपदेखील वापरकर्त्यांना आकर्षित करून घेण्यासाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतो. मात्र व्हॉट्पअॅपमध्ये एक फीचर आहे ज्याबाबत क्वचित कोणाला माहिती असेल. व्हॉट्पअॅपच्या या फीचरद्वारे तुम्ही तुमची जवळची व्यक्ती व्हॉट्पअॅपवर कोणाशी बोलत आहे हे जाणून घेऊ शकता.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामधून, व्हॉट्पअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मिडियामुळे नात्यांमध्ये दुरावा आल्याचे लक्षात आले आहे. तासन तास सोशल मिडियावर सतर्क राहून, नेहमी कोणा ना कोणाशी चॅट करत राहिल्याने जवळच्या व्यक्तींपासून आपण दूर जाऊ लागलो आहोत. खासकरून कपल्समधील समस्या यांमुळे अधिकच वाढल्या आहेत. याची परिणती नाते संपवण्यातही होऊ शकते. कपल्समध्ये आपला पार्टनर सतत दुसऱ्या कोणाशीतरी बोलत आहे अशी शंकाही यामुळे येऊ शकते. मात्र तुमच्या मनातही असा संशय असेल, आणि तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल की तुमच्या पार्टनर सर्वात जास्त कोणाशी बोलत आहे, किंवा कोणाला सर्वात जास्त फोटोज-व्हिडीओज पाठवत आहे, तर या फीचरचा नक्की उपयोग होऊ शकतो. ज्यामुळे वेळीच तुम्ही सावध होऊन तुमचे नाते वाचवू शकता. (हेही वाचा : नव्या वर्षात WhatsApp मध्ये पाहायला मिळतील हे नवे फीचर्स)

ही ट्रिक एकदम सोपी आहे. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीबाबत ही माहिती हवी आहे त्याचा फोन प्राप्त करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्पअॅपमध्ये उजव्या बाजूच्या वरील कोपऱ्यात सेटिंग्जवर क्लिक करा. तिथे तुम्हाला डेटा आणि स्टोरेज यूसेज ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या लोकांच्या नावांच्या यादी दिसेल ज्यांच्यासोबत त्या फोनमधून सर्वात जास्त मेसेज, व्हिडीओ, फोटोज शेअर झाले आहेत.