WhatsApp | (Photo credit: archived, edited, representative image)

व्हॉट्सअॅप जगभरातील सर्वात जास्त युजर्सची संख्या असलेले मेसेजिंग अॅप असून नेहमीच आपला दर्जा उत्तम रहावा यासाठी विविध नवे अपडेट आणते. युजर्सला बदलत्या काळानुसार त्याप्रमाणे अपडेट मिळतातच पण आता एक नवे फिचर्स लवकरच व्हॉट्सअॅप युजर्सला वापरता येणार आहे. त्यानुसार बीटा अपडेट वर्जन 2.19.332 मध्ये दोन नवीन फिचर्स येणार असून बीटा टेस्टर्ससाठी देण्यात येणार आहेत. त्याचसोबत युजर्सला त्रास देणाऱ्या क्रमांकांना ब्लॉक करणे सुद्धा सोपे होणार आहे. यापूर्वी बीटा वर्जन 2.19.120.20 मध्ये नव आयकॉन आणि प्रोफाइल फोटो लोगो मध्ये बदल दिसून आला होता.

WABetaInfo यांच्या रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, नवे फिचरबाबत काम सुरु करण्यात आले असून ते लवकरच रोलआउट करण्यात येणार आहे. त्यामध्ये एखाद्याने जर तुम्हाला ब्लॉक केल्यास त्याबाबत तुम्हाला नोटिस मिळणार आहे. तसेच 'You blocked this contact. Tap to unblock.' असे दाखवले जाणार आहे. तर एखाद्या युजर्सला अनब्लॉक केल्यानंकर लेबल दाखवला जाणार असून त्यामध्ये 'You unblocked this contact' असे दिसणार आहे. यामध्ये खासियत आहे की, ब्लॉक केल्याचे लेबल फक्त ज्या व्यक्तीला ब्लॉक केले आहे त्यालाच दिसणार आहे.(Facebook Pay या सुविधेमुळे आता Messenger, WhatsApp, आणि Instagram च्या माध्यमातून करू शकाल आर्थिक व्यवहार)

बीटा अपडेटच्या दुसऱ्या फिचर्समध्ये युजर्सला ब्लॉक करण्यात आलेल्या क्रमांकांना एका वेगळ्याच कॅटेगरीत करण्यात येणार आहे. हे फिचर ऑटोमेटिकली ब्लॉक करण्यात आलेल्या कॉन्टेक्ट वेगळ्या कॅटेगरीत दिसणार असून पुन्हा अरेंज करणार आहे. तर आयफोनबाबात बोलायचे झाल्यास व्हॉट्सअॅपने स्प्लॅश स्क्रिनला रिडिझाइन केले आहे. त्यामुळे आता हाच लोगो युजर्सला व्हॉट्सॅपच्या सेटिंगमध्ये दिसणार आहे. तसेच नव्या अपडेटनुसार युजर्सला अकाउंट सुरु करण्यासाठी रजिस्ट्रेशन कोड द्यावा लागणार आहे.