2021 मध्ये 'या' स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp; पहा यादी, कदाचित तुमचा फोन तर नाही
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

नवीन वर्ष येऊ घातले आहे. नवीन वर्षात अनेक जुन्या गोष्टी मागे पडतात, तंत्रज्ञानाचेही असेच आहे. नवीन वर्ष येताच व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणे बंद करते. त्यामुळे आपण कर का अँड्रॉईड (Android) किंवा आयओएस (IOS) युजर्स असाल आणि संवादासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. बातमीनुसार नवीन वर्ष 2021 मध्ये काही आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. ज्या फोनमध्ये 1 जानेवारीपासून व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही अशा स्मार्टफोनची यादीही कंपनीने जारी केली आहे. नवीन वर्षात व्हॉट्सअ‍ॅप iOS 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमच्या खालील स्मार्टफोनवर कार्य करणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपचे सपोर्ट पेज युजर्सना ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जन वापरण्याचा सल्ला देते जेणेकरुन ते अ‍ॅपची सर्व वैशिष्ट्ये वापरू शकतील. सांगितले गेले आहे की, आयफोन वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी iOS 9 किंवा त्याहून अधिक आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांनी 4.0.3 किंवा त्यावरील व्हर्जन वापरले पाहिजे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या घोषणेनंतर नव्या वर्षापासून iPhone4 पर्यंतच्या मॉडेलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट मिळणार नाही. त्याचबरोबर, iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6S मध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी त्यांना कमीतकमी आयओएस 9 वर अपग्रेड करणे आवश्यक आहे. अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr आणि Samsung Galaxy S2 मध्ये नवीन वर्षात व्हॉट्सअॅप चालणार नाही. मात्र, व्हाट्सएप अशा स्मार्टफोनमध्ये कार्य करेल ज्यांचे पॅच ऑपरेटिंग सिस्टम अपडेटसह अद्यतनित केले गेले आहे. (हेही वाचा: Instagram वरील 'या' दमदार फिचर्स बद्दल अधिक जाणून घ्या)

आपला फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करीत आहे हे आपण सहजपणे तपासू शकता. आयफोन वापरकर्त्यांना Settings मध्ये जाऊन नंतर General व नंतर Information वर जावे लागेल. येथे आपल्याला आपल्या आयफोनच्या सॉफ्टवेअर आवृत्तीबद्दल माहिती मिळेल. अँड्रॉइड वापरकर्ते सेटिंग्जमध्ये जाऊन About Phone  वर क्लिक करून ही माहिती प्राप्त करून घेऊ शकतात.