WhatsApp Web मध्ये चॅट न Open करता 'या' पद्धतीने वाचू शकता मेसेज, फॉलो करा 'या' टीप्स
WhatsApp (Photo Credits: WhatsApp)

WhatsApp वर युजर्सच्या सुविधेसाठी काही खास फिचर्स दिले गेले आहेत. कंपनी सध्या नवनवे फिचर्स लॉन्च करत आहे. त्यामुळे युजर्सला चॅटिंग करताना अधिक मजा येईल. व्हॉट्सअॅपच्या फक्त मोबाईल नव्हे तर वेब वर्जन मध्ये ही तुम्हाला खास आणि उपयोगी फिचर्स दिले गेले आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅप वेब बद्दलच्या एका खास फिचर बद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही चॅटन ओपन न करता ही तुम्हाला आलेले व्हॉट्सअॅपवरील मेसेच वाचता येणार आहेत.(WhatsApp Shopping Button: भारतासह जगभरात उपलब्ध झाले व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन शॉपिंग बटण; चॅटमधून कॅटलॉग पाहून थेट खरेदी करू शकाल प्रॉडक्ट)

व्हॉट्सअॅप मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही व्हॉट्सअॅप वेब सुरु करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथम व्हॉट्सअॅप वेबवर दाखवण्यात आलेला QR कोड स्कॅन करावा लागणार आहे. मात्र आम्ही तुम्हाला वेब मध्ये चॅट न ओपन करता सुद्धा तुम्ही कसे ते वाचू शकता याबद्दलच्या काही सोप्प्या स्टेप्स सांगणार आहोत.(Google Virtual Diwali 2020: दिवाळी साठी गुगलचा नवा AR Experiment; जाणून घ्या, घरबसल्या कसे कराल ऑनलाईन सेलिब्रेशन?)

>>प्रथम तुम्हाला व्हॉट्सअॅप वेब सुरु करावे लागणार आहे. असे केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅपचे अकाउंट लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सुरु होईल.

>अकाउंट सुरु झाल्यानंतर जर तुम्हाला एखादा मेसेज आल्यास त्यावर कर्सर घेऊन जा. त्यामुळे तुम्हाला आलेला मेसेज दिसला जाऊन तो तुम्ही वाचू शकता.

WhatsApp ने नुकतेच आपल्या युजर्ससाठी उत्तम सुविधा देण्यासाठी काही खास फिचर्स उपलब्ध केले आहेत. त्यामध्ये WhatsApp Pay हे सर्वाधिक खास फिचर आहे. या फिचरच्या मदतीने आता युजर्सला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. हे एकदम डिजिटल वॉलेट पद्धतीने काम करते. या फिचरच्या मदतीने तुम्ही चॅटिंगच्या वेळीच एखाद्या मित्राला किंवा घरातील मंडळींना पैसे पाठवू शकता. व्हॉट्सअॅप पे सर्विस ही भारतातील 10 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे युजर्सला आपल्या पद्धतीने कोणत्याही भाषेचा वापर करता येणार आहे.