WhatsApp Update: आता कुठल्याही भाषेत पाठवा व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉट्सअॅप कडून नवा फिचर लॉंच
WhatsApp | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अरे व्हॉट्सअप आता किती वेळेस मन जिंकशील, असचं काहीस व्हॉट्सअप वापरकर्त्यांवर म्हणण्याची वेळ आली आहे. व्हॉट्सअप हे जगभरात सर्वात जास्त वापरण्यात येणारं मेसेजींग अपलिकेशन आहे. व्हॉट्सअपद्वारे कित्येक अवघड वाटणारी काम आता सोपी झाली आहेत. व्हॉट्स अप कायमचं त्याच्या वापरकर्त्यासाठी भन्नाट फिचर घेवून येताना दिसतो. पण यावेळी व्हॉट्सअप ट्रान्सलेशन म्हणजेचं भाषांतर फिचर घेवून आला आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा असल्यास तो मेसेज केवळ इंग्रजीतचं करावा असं बंधनकारक नाही किंवा आता तुम्हाला तुमच्या सवयीच्या भाषेतचं कुठल्याही वेगळ्या किपॅडची गरज पडणार नाही. तर आता व्हॉट्सअपमध्येचं इनबिल्ट भाषांतर फिचर येणार आहे ज्यानुसार तुम्ही तुमच्या सोयिस्कर भाषेत व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू शकता. तरी तुम्हाला हा नवा फिचर कसा वापरता येईल याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

 

तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाईप केला की त्या मेसेजवर लॉंग प्रेस करा त्यानंतर तिकडे विविध ऑप्शन् दिसतील त्यापैकी मोर ऑप्शनवर क्लीक करा आणि ट्रान्सलेशन म्हणजेचं भाषांतर हा ऑप्शन निवडा. त्यावर क्लीक केल्यास तुम्हाला विविध भाषांचे ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्हाला ज्या भाषेत मेसेज पाठवायचा आहे ती भाषा निवडा आणि त्यावर क्लीक केल्य़ास तुमचा मेसेज लगेच भाषांतरीत होईल. तसेच तुम्हाला हव्या त्या भाषेत तुम्ही तुमचा मेसेज सेंड करु शकाल. (हे ही वाचा:-WhatsApp Update: व्हॉट्सअपचा नवा अपडेट, व्हॉट्सअप चॅट हिस्टरी संबंधी वापरकर्त्यांसाठी भन्नाट फिचर लॉंच)

 

तसेच व्हॉट्सअप आता त्याच्या फोटो क्वालिटीबाबत देखील एक महत्वपूर्ण फिचर घेवून येणार आहे. व्हॉट्सअपवर फोटो सेंड केल्यास फोटोची गुणवत्ता कमी होते अशी समज आहे. पण यावर देखील आता व्हॉट्सअप तोडगा घेवून आला आहे. व्हॉट्सअपवर जेव्हा तुम्ही कुठलाही फोटो सेंड कराल तेव्हा तुम्हाला तिकडे सेटींग ऑप्शन दिसेल. त्यावर क्लीक केल्यास तुम्हाला फोटो क्वालिटी हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लीक केल्यास तुम्ही ओरिजीनल क्वालिटीचे फोटो व्हॉट्सअपद्वारे सेंड करु शकाल. तरी व्हॉट्सअपचं हे फिचर टेलिग्रामबरोबर स्पर्धा करणारं आहे. अजून तरी व्हॉट्सअप कडून हा फिचर लॉंच करण्यात आलेला नाही पण लवकरचं हा अपडेट घेवून येणार असल्याची टेकवर्ल्डमध्ये मोठी चर्चा आहे.