WhatsApp Update: व्हॉट्सअपचा नवा अपडेट, व्हॉट्सअप चॅट हिस्टरी संबंधी वापरकर्त्यांसाठी भन्नाट फिचर लॉंच
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्स अॅपचे जगभरात करोडो वापरकर्ते आहेत. WhatsApp मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि WhatsApp बिझनेस असे दोन प्लाटफॉर्म व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप मेसेंजरची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी सतत नवीन अपडेट्स आणि फिचर्स घेवून येताना दिसते. तरी आता पुन्हा एकदा व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवा अपडेट घेवून येणार आहे.  सोशल मीडिया टेक जायंट Android वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअप एक नवीन बीटा आवृत्ती जारी करणार आहे. व्हॉट्स अॅपचे नवीनतम अपडेट बिल्ड व्हर्जन 2.23.2.6 सह आणले जात आहे. बीटा पुनरावृत्ती असल्याने, हे यावेळी केवळ निवडक व्हॉट्सअॅप ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेट्स संबंधित काही विशेष बदल बघायला मिळणार आहे. व्हॉट्सअप रिपोर्ट स्टेटस अपडेट या नव्या फिचरनुसार व्हॉट्स अॅप चॅट संबंधीत मिळणार आहे.

 

व्हॉट्सअपच्या या नव्या अपडेटनुसार Android 2.23.2.6 साठी WhatsApp बीटा अपडेटसह, व्हॉट्सअप चॅट हिस्टरी एका Android डिव्हाइसवरुन दुसऱ्या अनरॉइड डिव्हाईसमध्ये सहज ट्रान्सफर करता येणार आहे. तसेच यापुढे नवीन अँड्रॉइड फोन गुगल ड्राइव्हशिवाय वापरता येणार आहे परंतु यासाठी काही अतिरिक्त परवानग्या घेणं गरजेचं असणारं आहे. अजुन तरी व्हॉट्सअच्या सगळ्या वापरकर्त्यांसाठी हा अपडेट उपलब्ध नसला तरी लवकरचं व्हॉट्सअप हा अपडेट लॉंच करणार आहे. (हे ही वाचा:- ShareChat Layoffs: Twitter, Facebook नंतर आता शेअरचॅटने दिला 20 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ)

 

गेल्या आठवड्यातचं व्हॉट्सअप एक नवा आणि भन्नाट फिचर घेवून आला. ज्यानुसार आता विना इंटरनेट व्हॉट्सअप वापरता येणार आहे. म्हणजे व्हॉट्सअप चॅट करायला आता इंटरनेटची गरज नसणार आहे. या अफलातून अपडेट नंतर व्हॉट्सअप आता व्हॉट्सअप स्टेटस संबंधीत एक अनोखा फिचर घेवून येत आहे. ज्यानुसार आता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेट्स संबंधित काही विशेष बदल बघायला मिळणार आहे. व्हॉट्सअप रिपोर्ट स्टेटस अपडेट या नव्या फिचरनुसार व्हॉट्स स्टेटस संबंधीत सुरक्षा मिळणार आहे.