Whats App Blue Tick (Photo Credits-Twitter)

जगप्रसिद्ध आणि सर्वांच्या आवडीचे अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) नेहमीच आपल्या युजर्ससाठी विविध फीचर्स आणि अपडेट घेऊन येत असतो. त्याचसोबत सध्या व्हॉट्सअॅपने दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग संदर्भात बदल केले आहेत. मात्र आता व्हॉट्सअॅपने आयफोन धारकांसाठी चॅटिंग संदर्भात सुपर ट्रिक आणली असून आता निळ्या रंगाची टिक दिसणार नसल्याची माहिती दिली आहे.

व्हॉट्सअॅपवर आलेला एखादा मेसेज आपण वाचल्यानंतर पाठवलेल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने मेसेज पाहिला आहे की नाही याबाबत समजते. मात्र आयफोन युजर्स आता यापासून वाचणार आहेत. आयफोनच्या नवीन मॉडेल्समधील 3-D टच असणारे स्मार्टफोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्याचसोबत स्क्रिनवर थोडे जोरात दाबल्यावर तुमच्यासमोर काही नवीन ऑप्शनस तुम्हाला दिसतील. त्यामध्येच तुम्हाला व्हॉट्सॅपचे ऑप्शन दिसून येईल.

या ऑप्शनवर क्लिक केल्यांतर प्रेस आणि होल्ड केल्यावर व्हॉट्सॅप फूल स्क्रिन प्रिव्हू घेतो.या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला आलेले मेसेज एकत्र वाचता येणार आहेत. त्याचसोबत ज्या व्यक्तीने तुम्हाला मेसेज पाठवला आहे त्याला निळ्या रंगाची टिक ही दिसणार नाही.