Whatsapp वरुन तुमचे जुने मेसेज गायब होतायत? हे असू शकते कारण
व्हॉट्सअ‍ॅप (Photo Credits: Pixabay)

मेसेजिंग अॅपमध्ये व्हॉट्सअॅप (Whatsapp) सर्वात लोकप्रिय ठरले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु व्हॉटसॅपच्या बाबतीत काही समस्या युजर्सना सहन कराव्या लागतात. पण व्हॉट्सअॅप नेहमीच नव नव्या फीचर्समुळे त्याच्या युजर्सला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र गेल्या काही दिवसात व्हॉट्सअॅप युजर्सनी Scam Reports सादर केले आहेत. तसेच काही युजर्सचे त्यांचे जुने मेसेजेस गायब झाल्याचे सांगितले आहे.

भारत मिश्रा नावाच्या व्यक्तीने विविध वेबासाईट्स वर मोबाईलच्या व्हॉट्सअॅप मधील जुने मेसेजेस गायब झाल्याची तक्रार केली आहे. याबाबत मी व्हॉट्सअॅपला तक्रार करुनही अद्याप त्याचे उत्तर आलेले नसल्याचे सांगितले आहे. तर व्हॉट्सअॅप मेसेजेस गायब होण्याचे प्रकार यापूर्वीही घडल्याचे या व्यक्तीने नमूद केले आहे.

व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षात एका पार्टनरशिप बद्दल सांगितले होते. त्यावेळी अॅपचे बॅकअप ड्राईव्ह वर सर्व कार्य अवलंबून असेल असे सांगितले होते. तसेच एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागल्यास बॅक अप ड्राईव्ह अपडेट न झाल्यास ते काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. तसेच व्हॉट्सअॅप मधील Bugs मुळे ही काही वेळेस ही समस्या येत असल्याचे सांगितले गेले होते.