फोटो सौजन्य- Digital Trends

जगभरात सातत्याने वापरले जाणारे व्हॉट्सअॅप हे त्याच्या युझर्ससाठी प्रत्येकवेळी नव नवे फीचर्स आणते. त्यामुळे पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपने आणखी नवीन चार फीचर्स त्याच्या युजर्ससाठी आणले आहे. तर हे फीचर्स सुरुवातीला iPhoneXR, iPhoneXS आणि iPhoneXS Max करिता उपलब्ध होणार आहे. तसेच काही महिन्यांनंतर हे फीचर्स अँड्रॉईड फोनसाठी सुद्धा लागू होणार आहेत. पाहूया कोणते आहे ते नवीन चार फीचर्स : -

1.व्हॉट्सअॅपने आणलेल्या नवीन फीचर्समध्ये बबल अॅक्शनमध्ये एक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बबल मेन्यू पॉपअम अधिक वेळ राहणार आहे. तर मॅसेजेसाठी रिप्लाय, फॉरवर्ड, डिलिट, स्टार असे विविध ऑप्शन देण्यात आले आहे. नवीन फीचर्सच्या सहाय्याने व्हॉट्सअॅप हे आता पूर्णपणे रि-डिझाईन करण्यात आले आहे.

2.तसेच यामध्ये आयओएस युजर्ससाठी ऑडिओ मेसेज टॅप न करता ऐकू येणार आहे. परंतु याआधी आयोएस युजर्सला तो मॅसेज टॅप केल्याशिवाय ऐकू शकत येत नव्हता.

3.तर व्हॉट्सअॅपचे 2.18.100 या व्हर्जनमध्ये व्हिडिओ पाहण्याकरिता प्रिव्ह्यू ऑप्शन देण्यात आला आहे.

4. मात्र व्हॉट्सअॅपच्या स्टेस्टसाठी ईमोजी किंवा टेक्स मेसेजला पर्याय म्हणून आता त्या स्टेटसला रिप्लाय करण्यासाठी व्हॉईस मेसेज, व्हीकार्ड, लोकेशन याचा उपयोग करता येणार आहे. तर येत्या काही दिवसातच हे नवीन फीचर्स व्हॉट्सअॅप युझर्सना वापरता येणार आहेत.