सक्रिय वापरात नसतानाही, अँड्रॉइड डिव्हाइसच्या (Android Devices) मायक्रोफोनवर कथितरित्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) ऍक्सेस करत असल्याची चर्चा आहे. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली असून सरकार याबाबत लवकरच तपास करणार असल्याचे समजते. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी माहिती देताना याबाबत सुतोवाच केले आहे.
अभियांत्रिकी संचालक फोड डबिरी (Foad Dabiri) यांनी दावा केला आहे की, WhatsApp यूजर्सच्या नकळत आणि युजर्स सक्रीय नसतानाही मायक्रोफोन ऍक्सेस करते. मी झेपेत असताना सकाळी 6 वाजलेपासून WhatsApp माझ्या नकळत (पार्श्वभूमीत) माझा फोन एक्सेस करत आहे. दरम्यान, हे ट्विट व्हायरल झाले आणि त्याला 60 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. व्हॉट्सअॅपने डबिरी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आणि चंद्रशेखर यांच्या ट्विटपूर्वी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला विश्वास आहे की हा Android वरील एक बग आहे जो त्यांच्या गोपनीयता डॅशबोर्डमधील माहितीची चुकीची विशेषता देतो. आम्ही Google ला चौकशी करून त्यावर उपाय करण्यास सांगितले आहे.
ट्विट
This is an unacceptable breach n violation of #Privacy
We will be examinig this immdtly and will act on any violation of privacy even as new Digital Personal Data protection bill #DPDP is being readied.@GoI_MeitY @_DigitalIndia https://t.co/vtFrST4bKP
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) May 10, 2023
चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की,भारताकडे अद्याप डेटा संरक्षण विधेयक नसले तरीही या प्रकाराची चौकशी करेन. IT मंत्रालयाकडून नवीन डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक DPDP तयार केले जात आहे. तोवर गोपनीयतेच्या कोणत्याही उल्लंघनावर कारवाई केली जाईल, असे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.