WhatsApp: व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना मोठा झटका! 31 डिसेंबरनंतर 'या' स्मार्टफोनमध्ये वापरता येणार नाही व्हॉट्सअॅप
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

जो प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन वापरतो तो प्रत्येकचं व्यक्ती व्हॉट्सअप वापरतो असं म्हणायला हरकत नाही. व्हॉट्सअपच्या आधी आणि नंतर कित्येक मोबाईल अप आलेत आणि गेले. पण व्हॉट्सअप मात्र या शर्यतीत कायम टिकून राहिला. व्हॉट्सअपच्या सुरुवातीच्या काळात फक्त मेसेजेस पाठवता यायचे पण आता व्हॉट्सअपने एवढे नवनवीन अपडेट्स आणले आहेत की व्हॉट्सअपला कॉम्पिटीशन देणार मोबाईल कम्युनिकेशन अप कुठलही नाही. तरी आता व्हॉट्सअप एवढं सवयीचं झालयं की तु मला हे अमुक-तमुक व्हॉट्सअप कर असं सहज बोलून जातो. अगदी लहानग्यांपासून ते तुमच्या स्मार्टफओन वापरकर्त्या आजी आजोबा पर्यत सगळीचं मंडळी व्हॉट्सअप वापरतात पण आता नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही आहे.

 

व्हॉट्सअप अनेक फोन्समधील सपोर्ट बंद करणार आहे. व्हॉट्सअप यावर्षीच्या अखेरला म्हणजेच ३१ डिसेंबरपासून ४९ स्मार्टफोन्समधील WhatsApp चा सपोर्ट बंद करणार आहे. या डिव्हाइसमधील लिस्टमध्ये जे फोन आहेत. त्याला अपग्रेड करण्याची वेळ आली आहे, असं व्हॉट्सअप कडून सांगण्यात आलं आहे. WhatsApp ने जवळपास ५० स्मार्टफोन्समधील सपोर्ट काढून घेत असल्याची माहिती दिली आहे. तरी जुन्या स,मार्टफोनमध्ये व्हॉट्सअपचे काही लेटेस्ट फीचर्स वापरता येत नाही म्हणुन व्हॉट्स अपने जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवरील फोनचा सपोर्ट काढून घेण्याचे ठरवले आहे. (हे ही वाचा:- WhatsApp Update: आता विना सिक्युरिटी कोड तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही, जाणून घ्या काय आहे व्हॉट्सअपचा नवा अपडेट)

 

तरी तुम्ही देखील हा स्मार्ट फोनचे वापरकर्ते असल्यास तुम्हालाही तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअप वापरता येणार नाही. यांत सॅमसंग फोनचे काही जुने मॉडेल्स, सोनी, एलजी, लिनोव्हो, एचटीसीच्या जुन्या मॉडेलच्या फोनसह अपल आयफोन५ आणि आयफोन५सीचा समावेश आहे. तरी तुम्ही देखील या फोनचे वापरकर्ते असल्यास तुम्हाला आता तुमच्या फोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही.