WhatsApp ग्रुपमध्ये सर्वांना दिसणारा नंबर आता तुम्ही Hide करू शकता, पाहा WhatsApp चे अप्रतिम फिचर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

WhatsApp: WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे. गोपनीयतेच्या दृष्टीने हे नवीन फिचर खूप महत्त्वाचे आहे. नवीन फिचरच्या मदतीने युजर्स आपला फोन नंबर लपवू शकतील. या अप्रतिम रे फीचरला WhatsAppच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.22.17.23 मध्ये बघितले आहे. हे फिचर अॅप, गुगल प्ले, बीटा प्रोग्रामद्वारे उपलब्ध आहे. 

अहवालानुसार, हे फीचर सध्या प्रोग्रेसमध्ये आहे. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, WhatsApp  लवकरच लोकांना WhatsApp ग्रुपमधून फोन नंबर लपवण्याचा पर्याय देऊ शकते. हे फीचर सुरुवातीला अँड्रॉइड यूजर्ससाठी लॉंच केले जाऊ शकते.

हे नवीन फिचर डिफॉल्ट डिएक्टिवेट होते. तुम्ही ग्रुपमध्ये सामील झाल्यावर तुमचा फोन नंबर सर्व सदस्यांपासून Hide करू शकता. तथापि, नंतर तुम्ही ते स्वतःहून विशिष्ट उप-समूहात शेअर  करू शकता. हे Android बीटा आवृत्ती 2.22.17.23 साठी आणले जात आहे. अहवालात याबाबतचा स्क्रीनशॉटही दाखवण्यात आला आहे. यामध्ये फोन नंबर शेअरिंग फीचर दाखवले जात आहे. ही कार्यक्षमता केवळ WhatsApp समुदायासाठी उपलब्ध करून दिली जाईल. फायनल रिलीज होण्यापूर्वी त्यात बदल केले जाऊ शकतात, असे मानले जात आहे.

 

ग्रुप अॅडमिन कोणताही मेसेज डिलीट करू शकतील

WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, WhatsApp लवकरच एक फीचर आणू शकते ज्यामुळे ग्रुप अॅडमिन्सना कोणताही मेसेज डिलीट करता येऊ शकते. लक्षात घ्या की, ही सेवा फक्त काही विशिष्ट बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही ग्रुप अॅडमिन असाल आणि तुम्हाला डिलीट फॉर एव्हरीवन फीचर दिसत असेल, तर ही सेवा तुमच्यासाठी प्रदान करण्यात आली आहे.