WhatsApp वर Dark Mode कसे सुरु कराल? जाणून घ्या
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

सोशल नेटवर्किंग मध्ये सध्या युजर्सच्या पसंदीस पडत असलेले व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) लाखोच्या संख्येने युजर्स आहेत. तर प्रत्येक वेळी व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवीन फिचर्स घेऊन येत असते. तर आता व्हॉट्सअॅप लवकरच डार्क मोड सुरु करणार आहे.

मात्र गुगल क्रोम आणि इतर काही गुगल अ‍ॅप्स सोबत फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचर्स उपलब्ध करुन दिले आहे. जर तुम्ही अँन्ड्राॉई़़ड स्मार्टफोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन Android Q च्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का हे का ते पाहा. अनेक Andorid Mobile फोन Android Q च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. या लिस्टमध्ये गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे.

सर्वप्रथम स्मार्टफोनच्या ‘Settings’ मध्ये जाऊन ‘Display’ ऑप्शनवर टॅप करा.

- ‘Select Theme’ वर टॅप करून Dark ऑप्शनवर क्लिक करा.

- Settings मध्ये खाली देण्यात आलेल्या ‘Developers Options’ वर जा.

- Settings मध्ये Developers Options टॅब येत नसेल तर Settings मध्येAbout phone असलेल्या Build number वर सात वेळा क्लिक कर अ‍ॅक्टिवेट करू शकता. त्यानंतर Settings मध्ये Developers Options चा समावेश होईल.

- WhatsApp Settings मध्ये जाऊन ‘Wallpaper’ ऑप्शनवर क्लिक करून ‘None’ वर क्लिक करा असं केल्यास व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडवर काम करेल.

(2020 पासून 'या' स्मार्टफोनमध्ये WhatsApp बंद होणार)

तर व्हॉट्सअॅपने FAQ मध्ये स्पष्ट केले आहे की, Android 2.3.7 या स्मार्टफोनसह iOS 7 वर्जनमधील सर्व आयफोनमध्ये 1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्याचसोबत या स्मार्टफोनच्या युजर्सला व्हॉट्सअॅप अकाउंट पुन्हा सुरु करता येणार नाही.