WhatsApp IP Protect Feature: आता व्हॉट्सअॅप कॉलिंग होणार सुरक्षित, नवीन फिचर लाँच
WhatsApp Pixabay

मेसेंजर App व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फिचर आणलं आहे. जे ऑन केल्यानंतर युजरची व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग सुविधा सुरक्षित होणार आहे. अगदी दहा सेकंदांमध्ये सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची चिंता मिटणार आहे.यूजर्सची हीच सुरक्षा अधिक मजबूत व्हावी यासाठी मेटाच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मद्वारे आयपी प्रोटेक्ट फीचर (WhatsApp IP Protect Feature) देण्यात आले आहे. याचा वापर करून तुम्ही WhatsApp आणखी सुरक्षित करू शकता.  (हेही वाचा - Articles Feature On X: एलोन मस्कने लाँच केलं आर्टिकल फीचर; जाणून घ्या ट्विटरवर 'कसे' लिहू शकाल Long Form Content)

व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये उपलब्ध झालेल्या फिचरचा फायदा घेतला तर आयपी अ‍ॅड्रेस सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे कुठलीच माहिती चोरली जावू शकत नाही.

व्हाट्सएप आयपी प्रोटेक्ट फीचर कसं Active कराल?

सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये जावून प्रायव्हसीवर टॅप करा.

प्रायव्हसीमध्ये Advaced वर टॅप करा. पुढे Protect IP Adress in calls यावर टॅप करुन हा ऑप्शन ऑन करावा.

या सेटिंगमुळे युजरचा आयपी अ‍ॅड्रेस सुरक्षित राहणार आहे आणि कुणालाही तुमचं लोकेशन ट्रॅक करता येणार नाही. शिवाय इतरही सुविधा यामुळे मिळणार आहेत. मेटाकडून नेहमी युजरच्या सुरक्षेचा विचार केला जातो. त्यामुळे नवनवीन फिचर आणले जातात. ते फॉलो केले तर तुमचा डेटा सुरक्षित राहू शकतो.   यूजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन, व्हिडीओ-फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपवर अनेक प्रकारचे सेफ्टी फीचर्स देखील अपडेट होत असतात. यूजर्सची हीच सुरक्षा अधिक मजबूत व्हावी यासाठी मेटाच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मद्वारे अनेक फिचर्स आणले जातात.