WhatsApp (Photo Credits: Pixabay)

युजर्ससाठी नवेनवे फिचर सादर करणाऱ्या व्हॉट्सअॅप (Whatsapp) ने आपले नवे फिचर Always Mute लॉन्च केले आहे. या नव्या फिचरसोबत स्टोरेज हातळण्यासाठी नवीन UI (Storage Usage UI) आणि नव्या मीडिया गाईडलाईन्स (Media Guidelines) अॅनरॉईड बीटा युजर्ससाठी (Android Beta Users) सादर करण्यात आल्या आहेत. WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.20.201.10 बेटा व्हर्जन मध्ये हे नवे फिचर अॅड करण्यात आले आहे. हे फिचर अद्याप नॉर्मल युजर्ससाठी व्हॉट्सअॅपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये अॅड करण्यात आलेले नाही.

या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपमधील चॅट म्यूट (Mute) करताना येणारा वन एअर (One Year) ऑप्शन काढून टाकून त्या ऐवजी Always Mute चा ऑप्शन देण्यात आला आहे. या फिचरचा वापर करुन युजर्स एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुपला आयुष्यभरासाठी म्यूट ठेवू शकता. (WhatsApp Messages ओपन न करता कसे वाचाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स)

यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या 2.20.201.9 बीटा व्हर्जनमध्ये स्टोरेज युसेज युआय आणि त्यासंबंधित टूल्स रिलीज करण्यात आले होते. हा अपडेट अजूनपर्यंत सर्व युजर्सपर्यंत पोहचलेला नाही. व्हॉट्सअॅप बेटाचा नवीन अपडेट इंस्टॉल केलेल्या युजर्संना हे नवे फिचर्स पाहायला मिळतील. (WhatsApp स्टेटस डाऊनलोड करायचेय? 'या' सोप्प्या टिप्स लक्षात ठेवा)

व्हॉट्सअॅपच्या या नवनव्या फिचर्ससोबत मीडिया गाईडलाईन्स नावाचे आणखी एक फिचर लॉन्च करण्यात येणार आहे. या फिचरचा वापर करुन फोटो किंवा व्हिडिओ एडिट करताना त्यामध्ये तुम्ही स्टिकर्स किंवा टेक्स अॅड करु शकता. व्हेरिफाईड बिझनेस अकाऊंट्सच्या चॅटमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचे बटण डिसेबल करणाऱ्या फिचरसाठी व्हॉट्सअॅप सध्या कार्यरत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच युजर्सची स्टोरेज समस्या दूर करण्यासाठी नवे फिचर सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार Storage Usage UI रिलीज करण्यात आले आहे. बीटा व्हर्जनमधील टेस्टिंग हे सर्व नवे फिचर्स व्हॉट्सअॅपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध होतील आणि सर्व युजर्स त्याचा लाभ घेऊ शकतील.