एखाद्याचे WhatsApp स्टेटस डाऊनलोड करायचेय? 'या' सोप्प्या टिप्स लक्षात ठेवा
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

WhatsApp आपल्या युजर्ससाठी विविध सुविधांसाठी बदलत्या ट्रेन्ड नुसार नवे फिचर्स रोलआउट करतो. यामधील सर्वात खास म्हणजे व्हॉट्सअॅप स्टेटसचे फिचर आहे. युजर्सला या फिचरच्या माध्यमातून गुड मॉर्निंग, कोट्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येतात. मात्र या फिचरमधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते आपल्याला डाऊनलोड करता येत नाही. पण तुम्ही चिंता करु नका. कारण आम्ही आज तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील एखाद्याचे स्टेटस तुम्ही कसे डाऊनलोड करु शकता याबद्दल अधिक माहिती देणार आहोत.

व्हॉट्सअॅप स्टेट्ससाठी सुद्धा कंपनीकडून प्रायव्हीचे ऑप्शन दिले आहे. त्यामुळे तुमचे व्हॉट्सअॅपवरील स्टेटस कोणी पहावे किंवा पाहू नये हे सुद्धा तुम्हाला ठरवता येते. फक्त त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपमधील सेटिंग्स मध्ये जाऊन काही बदल करावे लागणार आहेत. तर जाणून घ्या दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात घेतल्या पाहिजेत. (WhatsApp Useful Tips: व्हॉट्सअॅपद्वारे English मध्ये चॅट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा 'या' सेटिंग्स)

>>व्हॉट्सअॅप स्टेटस डाऊनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही फोनमध्ये Status Downloader For WhatsApp अॅप इंन्स्टॉल करा.

>>तुम्ही जसे व्हॉट्सअॅप सुरु कराल तेथेच तुम्हाला हे ऑप्शन दाखवले जाईल. पहिले क्लिक टू चॅट आणि दुसरे स्टेटस डाउनलोडर असे दिसेल. यामधील दुसरा ऑप्शन स्टेटस डाउनलोडरवर क्लिक करा.

>>येथे तुम्हाला ते सर्व फोटो आणि व्हिडिओ दिसणार आहेत जे व्हॉट्सअॅप युजर्सकडून शेअर केले गेले आहेत.

>>आता जो फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा.

>>क्लिक केल्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ फाइल मॅनेजर मध्ये असलेल्या स्टेटस डाउनलोडर फोल्डरमध्ये  दिसून येणार आहे.

हे फिचर फक्त अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करुन दिलेले आहे. या व्यतिरिक्त ही ट्रिक वापरण्यासंबंधित   काही गोष्टी प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. तसेच हे फिचर वापरताना तुम्ही थर्ड पार्टी अॅपचा वापर करत आहात हे सुद्धा लक्षात घ्या.