Jio 5G Welcome Offer: रिलायन्स जिओ (Jio) ने आज 5 ऑक्टोबरपासून म्हणजेच दसऱ्याच्या निमित्ताने 4 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीचा समावेश आहे. याशिवाय, टेलिकॉम ऑपरेटरने Jio 5G Welcome Offer देखील जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना 1GPS+ स्पीडसह अमर्यादित 5G डेटा सुविधा मिळेल.
Jio ने त्यांच्या 5G सेवांसाठी बीटा चाचणी जाहीर केली आहे, याचा अर्थ प्रत्येकजण Jio 5G नेटवर्कमध्ये प्रवेश करू शकणार नाही. म्हणजेच सुरुवातीला काही युजर्सनाच ही सुविधा मिळणार आहे. जर तुम्ही या 4 पैकी कोणत्याही शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर तुम्ही Jio 5G वेलकम ऑफरचा लाभ घेऊ शकता. (हेही वाचा - WhatsApp Warning: व्हॉट्सअॅपवर चुकूनही पाठवू नका 'हे' 3 प्रकारचे व्हिडिओ, अन्यथा तुम्हाला जावं लागेल जेलमध्ये)
जिओ वापरकर्त्यांना मोफत सुविधा -
वेलकम ऑफर अंतर्गत, 5G फोन असलेले Jio वापरकर्ते मोफत 5G सेवा मिळवू शकतील. जेव्हा कंपनीने 2017 मध्ये 4G सेवा लॉन्च केली तेव्हा त्यांनी एक वेलकम ऑफर जाहीर केली ज्या अंतर्गत वापरकर्ते विनामूल्य 4G अॅक्सेस करू शकत होते. कंपनी यावेळीही तेच धोरण अवलंबेल, अशी अपेक्षा आहे.
काय आहे Jio 5G वेलकम ऑफर?
Jio 5G वेलकम ऑफर अंतर्गत, टेलिकॉम ऑपरेटर 1GBps+ स्पीडसह अमर्यादित 5G डेटा ऑफर करेल. असे सांगितले जात आहे की, 5G स्मार्टफोनसह 4 शहरांमध्ये राहणारे लोक आपोआप Jio 5G वेलकम ऑफरमध्ये अपग्रेड होतील. म्हणजेच यासाठी तुम्हाला कोणतीही विशेष प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.
कोणाला मिळणार Jio 5G वेलकम ऑफरचा लाभ -
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि वाराणसी या 4 शहरांमध्ये 5G स्मार्टफोन असलेल्या लोकांना Jio 5G वेलकम ऑफरमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर तुम्हाला 5G वापरण्यासाठी नवीन सिमची गरज नाही. पण जर तुमच्याकडे 5G फोन नसेल तर तो अॅक्सेस करणे कठीण आहे.