Wearable Air Conditioner Reon Pocket 5: उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा! Sony ने लाँच केला परिधान करण्यायोग्य AC, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Wearable Air Conditioner Reon Pocket 5 (संग्रहित संपादित प्रतिमा)

Wearable Air Conditioner Reon Pocket 5: देशभरात उष्णतेचा पारा वाढलेला दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशात या उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी सोनीने (Sony) एक खास उपकरण बाजारात अनके आहे. सोनीने एक नवीन घालण्यायोग्य डिव्हाइस लाँच केले आहे. हे उपकरण परिधान करण्यायोग्य एअर कंडिशनर आहे, ज्याला रेऑन पॉकेट 5 (Reon Pocket 5) असे नाव देण्यात आले आहे. हे उपकरण हाताने पकडलेल्या पंख्यासाठी एक नवीन पर्याय आहे.

आपण हे उपकरण आपल्या शर्ट किंवा टी-शर्टच्या मागील बाजूस जोडू शकता. सोनीचे ‘स्मार्ट वेअरेबल थर्मो डिव्हाईस किट’ Reon Pocket 5 हे एक वैयक्तिक पर्यावरण नियंत्रक आहे, जे तुम्हाला प्रवास करताना आराम देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Reon Pocket 5 थंड आणि उष्णता दोन्हीसाठी कार्य करते. याचा अर्थ उन्हाळा आणि हिवाळ्यात तुम्ही याचा वापर करू शकता. त्यात थंडीसाठी पाच आणि उष्णतेसाठी चार स्तर आहेत. याव्यतिरिक्त, हे उपकरण रिऑन पॉकेट टॅगसह देखील कार्य करते. हा टॅग रिमोट सेन्सरप्रमाणे काम करतो, जो सभोवतालचे तापमान ओळखतो आणि सर्वोत्तम कामगिरी देण्यासाठी त्यानुसार थंड किंवा उष्णता समायोजित करतो.

पहा व्हिडिओ-

Reon Pocket डिव्हाइस नवीन Reon Pocket ॲपसह देखील कार्य करते. हे ॲप आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही फोनसाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही ते अनुक्रमे ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. हे डिव्हाइस ब्लूटूथद्वारे कनेक्ट होते आणि या ॲपद्वारे तुम्ही थंड/उष्णतेची पातळी वाढवणे किंवा कमी करणे यासारखी मुख्य कार्ये नियंत्रित करू शकता.

Reon Pocket डिव्हाइसमध्ये ऑटो स्टार्ट/स्टॉप फंक्शन देखील आहे. याचा अर्थ असा आहे की ते पुन्हा पुन्हा चालू आणि बंद करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ते तुमच्या मानेखाली ठेवताच, आपोआप थंड/गरम होण्यास सुरुवात होईल आणि टेबलावर ठेवल्यावर काम करणे थांबेल. टेक रडारच्या मते, Reon Pocket 5 एका चार्जवर 17 तासांच्या बॅटरी लाइफचा दावा करते. Reon Pocket 5 हे नवीन, म्हणजे घालण्यायोग्य एअर कंडिशनरचे पाचवे मॉडेल आहे. पहिले मॉडेल 2019 मध्ये आले होते. (हेही वाचा: X To Launch Television App: लवकरच एलन मस्क लाँच करणार स्वतःचे टीव्ही ॲप; यूट्यूबशी होणार स्पर्धा)

आताचे हे नवीनतम मॉडेल सोनीच्या वेबसाइटवरून काही विशिष्ट देशांमध्येच खरेदी केले जाऊ शकते. Reon Pocket 5 साठी प्री-ऑर्डर सोनीच्या वेबसाइटवर खुल्या आहेत. याची किंमत £139 (सुमारे $170 USD किंवा AU$260) म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 14,543 इतकी आहे. या प्री-ऑर्डरची शिपिंग 15 मे पासून सुरू होईल. सोनी अतिरिक्त £25 मध्ये बेज नेकबँड ऑफर करत आहे.