X To Launch Television App: लवकरच एलन मस्क लाँच करणार स्वतःचे टीव्ही ॲप; यूट्यूबशी होणार स्पर्धा (Video)
एलोन मस्क लवकरच एक्स टीव्ही ॲप लॉन्च करणार असल्याची बातमी आहे. अशाप्रकारे टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक आता टीव्हीच्या दुनियेतही धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.
X To Launch Television App: एलोन मस्क त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पूर्णपणे बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही महिन्यात एक्समध्ये अनेक बदल झाल्याचे आपण पहिले. आता एलोन मस्क लवकरच एक्स टीव्ही ॲप लॉन्च करणार असल्याची बातमी आहे. अशाप्रकारे टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक आता टीव्हीच्या दुनियेतही धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत. एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांच्यामते, वापरकर्त्यांना X TV ॲपवर उच्च दर्जाचा कंटेंट मिळेल. या ॲपद्वारे युजर्सना त्यांच्या मोबाईलमधील कंटेंट टीव्हीवर कास्ट करण्याची सुविधाही मिळणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मला मोठी स्पर्धा मिळणार आहे. X TV लाँच केल्यानंतर X सोशल मिडिया TV वर देखील वापरता येईल. एक्सने अद्याप या ॲपच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. पोस्टमध्ये 'लवकरच येत आहे' असे लिहिले आहे. (हेही वाचा: Starlink Internet in India: एलोन मस्ककडून भारतासाठी खास भेट? स्टारलिंक देऊ शकतो देशात स्वस्त इंटरनेट)
पहा व्हिडिओ-
Coming soon to a television near you: X TV 👀 pic.twitter.com/C7VWNa7jG5
— News (@XNews) April 23, 2024
From the small screen to the big screen X is changing everything. Soon we’ll bring real-time, engaging content to your smart TVs with the X TV App. This will be your go-to companion for a high-quality, immersive entertainment experience on a larger screen. We’re still building it… pic.twitter.com/QhG6cVDpZ8
— Linda Yaccarino (@lindayaX) April 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2024 08:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

