वॉलमार्टचे मालकी हक्क असलेल्या Flipkart ला 10600 कोटींची नोटीस, फेमाचे उल्लंघन केल्याचा कथित आरोप
ED| Photo Credits: Twitter/ANI

ईडीकडून (ED) फेमाच्या कायद्याचे कथित उल्लंघन केल्याने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आणि त्याच्या प्रवक्त्यांना जवळजवळ 10,600 कोटी रुपांची कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे. अधिकृत सुत्रांनी ही माहिती बुधवारी दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, फेमाच्या विविध कायद्याअंतर्गत गेल्या महिन्यात 10 जणांना नोटिस धाडण्यात आली होती. त्यामध्ये फ्लिपकार्ट, त्याचे संस्थापक संचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांच्या नावाचा समावेश आहे.

सुत्रांनी असे म्हटले आहे की, तपास पूर्ण झाल्यानंतर नोटिस धाडण्यात आली आहे. कंपनीवर लावण्यात आलेल्या आरोपामध्ये एफडीआय नियमांचे उल्लंघन आणि मल्टी ब्रँन्ड रिटेलचे नियम करण्याचा समावेश आहे. त्यांनी असे म्हटले की, वॉलमार्टचे मालकी हक्क असलेली कंपनी आणि त्याचे अधिकारी आता न्यायालयीन निर्णायाला सामना करणार आहेत. एजेंसीचे चेन्नई स्थित एक विशेष निर्देशक रँकचे अधिकारी या कार्यवाहीचे संचालन करणार आहेत.

या प्रकरणी आता स्पष्टीकरण देत फ्लिपकार्टने असे म्हटले आहे की, वॉलमार्टचे सर्व मालकी हक्क असणारी कंपनी एफडीआयसह अन्य भारतीय कायद्यांचे पालन करते. फेमाच्या कथित उल्लंघनाप्रकरणी पाठवण्यात आलेल्या नोटिस संदर्भात त्यांच्याकडून ईडीला सहयोग केला जाईल.(E-RUPI Guide: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवे ई-रुपी डिजिटल पेमेंट सोल्यूशन केले लाँच, जाणून घ्या वापरायचं कसं ?) 

अधिकृत सुत्रांनी असे म्हटले की, अधिकारी आपल्या नोटीसनुसार 2009-2015 दरम्यानच्या कालावधी संबंधित या प्रकरमी तपास करणार आहे. त्यासाठी आम्ही पाठिंबा देऊ असे फ्लिपकार्ट कडून सांगण्यात आले आहे. कंपनीच्या संस्थापकांना तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.