Vodafone (Photo Credit Which.co.uk)

Vodafone Layoff: 2023 हे वर्ष मंदीच्या छायेत सुरू झाले आहे. गेल्या काही काळामध्ये देशातील आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या छाटणीची घोषणा केली आहे. आता या यादीत दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी Vodafone (Vodafone Layoff) चे नाव देखील जोडले गेले आहे. बाजारातील वाढत्या दबावाचा परिणाम व्होडाफोनवर झाला आहे. या कंपनीने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुढील 5 वर्षात शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.

व्होडाफोनने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला

बाजारातील मंदीचा प्रभाव लक्षात घेता, व्होडाफोनने नोव्हेंबर 2022 मध्येच आपल्या खर्चात कपात करण्याची घोषणा केली होती. कंपनीने घोषणा केली होती की, सन 2026 पर्यंत कंपनी आपला खर्च $1.08 बिलियन पर्यंत कमी करेल. स्पेनमधील टेलिफोनिका आणि फ्रान्समधील ऑरेंज यांसारख्या युरोपीय बाजारपेठेतील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी किमतीत 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Twitter Layoffs: पुन्हा एकदा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना नारळ, ट्विटरमधील ‘या’ विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरकपात)

फायनान्शिअल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, व्होडाफोन जगभरातील शेकडो नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. यामध्ये कंपनीच्या लंडन येथील कार्यालयात सर्वात मोठी छाटणी केली जाणार आहे. कंपनी जगभरातील सुमारे 1,04,000 लोकांना नोकऱ्या देते. या छाटणीचा भारतावर किती परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे.

व्होडाफोनशिवाय अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यामध्ये Byju's, Unacademy, Lead, Swiggy, Vedantu इत्यादी अनेक स्टार्टअप कंपन्या आहेत. 2023 हे वर्ष मंदीच्या छायेत सुरू झाले आहे. 2022 मध्येही ट्विटर, अॅमेझॉन, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.