Vivo Smartphone Representative Image (फोटो सौजन्य-ट्वीटर)

स्मार्टफोन निर्माता कंपनी  विवो (Vivo) लवकरच आपला एक नवा स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे. येत्या 10 जूनला Vivo Y50 हा एक जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. उत्तम बॅटरी लाईफ (Battery Life) आणि जबरदस्त स्टोरेज फिचर हे या स्मार्टफोनचे आकर्षण असणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्टिंग करण्यात आला आहे. याच्या उपलब्धतेविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम (RAM)आणि 5000mAh बॅटरी लाईफ (Battery Life)  देण्यात आली आहे.

Vivo Y50 च्या किंमतीविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र रिपोर्टनुसार, 8GB रॅम असलेल्या या फोनची किंमत 17,990 रुपये असण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ युजर्ससाठी खुशखबर, ग्राहकांना 'या' प्लॅनमध्ये Hotstar सह मिळणार 240GB पर्यंत डेटाची सुविधा

 या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, Vivo Y50 मध्ये 6.53 इंचाची HD डिस्प्ले देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. Vivo Y50 हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर वर चालेल.

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 4 रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा, 120 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 8MP चा वाइड अँगल कॅमेरा असेल. 2MP चा पोर्टेट शूटर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देखील असेल. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा सेंसर असेल.

या स्मार्टफोनचे आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असेल ज्याला फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.