अत्यंत कमी कालावधीत भारतीय ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरलेली कंपनी विवोने (Vivo) त्याच्या ग्राहकांना एक सुखद धक्का दिला आहे. विवोने आपल्या दोन जबरदस्त स्मार्टफोन्सच्या किंमतीत घट केली आहे. Vivo X50 आणि Vivo 19 च्या किंमतीत घट करण्यात आली असून ही कायमस्वरूपाची असल्याचे कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच ही घट काही दिवसांपुरता मर्यादित नाही. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. या दरानुसार, Vivo X50 च्या 8GB+128GB वेरियंटची किंमत 29,990 रुपये इतकी झाली असून यात 5,000 रुपयांची घट करण्यात आली आहे. तर Vivo X50 च्या 8GB+256GB वेरियंटची किंमत 32,990 रुपये इतकी करण्यात आली आहे.
तर Vivo V19 च्या 8GB+128GB स्टोरेजची किंमत 21,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनची आधीची किंमत 24,990 रुपये इतकी होती. तर दुसरीकडे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 24,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, झिरो डाउन पेमेंट स्किम आणि 1 हजार रुपयांच्या कॅशबॅकवर घरी घेऊन जाता येणार
Vivo X50 विषयी बोलायचे झाले तर, यात 6.56 इंचाची पुर्ण एचडी+अमोल्ड डिस्प्ले देण्यात आली आहे ज्याचे रिजोल्युशन 2376X1080 पिक्सेल इतके आहे. यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा पोर्टेट, 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 5MP चा मॅक्रो सेंसर लेन्स देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 4200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo V19 बद्दल बोलायचे झाले तर, यात 6.44 इंचाची फुल एचडी+अमोल्ड डिस्प्ले देण्यात आली आहे. ज्याचे रिझोल्युशन 2400X1080P आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB चे इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वाड कॅमेरा रियर सेटअप आहे. यात 48MP चा प्रायमरी, 8MP चा वाइ़ड अँगल, 2MP डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 32MP चा प्रायमरी आणि 8MP चे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात आले आहे. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॅट फास्ट चार्जिंगसह येते.